शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख किरण काळे यांच्यावर नगरच्या कोतवाली पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किरण काळे काही दिवसांपूर्वीच महिला अत्याचाराच्या गुन्हा प्रकरणी जेल मधून जामिनीवर आले बाहेर होते. मात्र आता त्यांच्या अडचणीत पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे.
किरण काळे आणि त्यांचे बंधू नितीन काळे यांनी कोतवाली पोलीस ठाण्यातील पोलिस कर्मचारी रामनाथ हांडाळ यांना धक्का बुक्की करून शिवीगाळ करत तुम्ही येथे कसे काम करता हेच पाहतो असे म्हणत काळे बंधूंनी दमदाटी केली अशी फिर्याद पोलीस कर्मचारी हंडाळ यांनी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये दिली आहे.