महाराष्ट्र

पनवेल कामोठे येथून कोकणात आलेला युवक बेपत्ता

Published by : Team Lokshahi

निसार शेख | चिपळूण | मुंबईतून कोकणात राजापूर येथे गणेशोत्सवासाठी आलेला एक युवक विसर्जन मिरवणूक वेळी बुडाल्याने बेपत्ता घराची दुर्दैवी घटना घडली आहे. रायपाटण येथील बाजार वाडी ह्या ठिकाणचा अक्षय दिलीप शेट्ये वय वर्ष 23 हा तरुण घरचा गणपती विसर्जन करण्यासाठी रायपाटण येथील अर्जुना नदीच्या पात्रात गेला होता. हे कुटुंब पनवेल कामोठे येथून कोकणात आपल्या गावी आलो होतं. बेपत्ता झालेला अक्षय हा मुंबई परिसरात खाजगी कंपनीत कामाला आहे.

गौरी गणपतीची विसर्जन मिरवणूक नदीवर सुरू असताना घोडकोंड (बाजारवाडी ) या नदीत वाहत गेल्याची दुर्दैवी घटना काल सायंकाळी 6:30 घडली आहे. या घटनेची माहिती कळताच उपविभागीय पोलिस अधिकारी यशवंत केडगे राजापूर तालुका पोलीस निरीक्षक भरत धुमाळ, उपनिरीक्षक सुधीर उबाळे, पोलीस हेड कोन्स्टबल कमलाकर तळेकर सहित पाचल मंडळ अधिकारी संजय पवार तलाठी सतीश शिंदे, सामाजिक कार्यकर्ते संतोष गांगण, राजा नलावडे, मनोज गांगण, कुणाल गांगण, विकास कोलते परिसरातील स्थानिक नागरिक या तरुणाचा शोध घेत होते रात्री उशिरा ही शोध होऊन थांबवण्यात आली आहे. या घटनेची नोंद राजापूर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.जिल्ह्यात गौरी गणपतीचे विसर्जन शांततेत व उत्साहात पार पडले. मात्र राजापूर येथे ही दुर्दैवी घटना घडली आहे. या बेपत्ता झालेल्या युवकाचा शोध राजापूर पोलीस व स्थानिक ग्रामस्थ घेत आहे

Patanjali: बाबा रामदेव पुन्हा अडचणीत; पतंजलीवर मोठी कारवाई

Dengue: राज्यात मागील पाच वर्षांत डेंग्यूच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ

RCB VS CSK: आरसीबीने 27 धावांनी विजय मिळवून प्लेऑफमध्ये केली दमदार एन्ट्री

Megablock: रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! मध्य रेल्वेवर 15 दिवस मेगाब्लॉक; तर काही गाडया रद्द

साताऱ्यातील मिनी काश्मीर आणि महाबळेश्वरमध्ये बरसला अवकाळी पाऊस