महाराष्ट्र

ड्रग माफिया ललित पाटील प्रकरणात पुणे पोलिसांची मोठी कारवाई

Published by : Siddhi Naringrekar

ड्रग माफिया ललित पाटील प्रकरणात पुणे पोलिसांची मोठी कारवाई करण्यात आली आहे. ललित पाटीलला पळून जाण्यास मदत करणाऱ्या दोघा पोलिसांना थेट पोलीस दलाच्या शासकीय सेवेतून बडतर्फ केलं आहे. नाथाराम काळे आणि अमित जाधव या दोन पोलिसांना थेट शासकीय सेवेतून काढून टाकत मोठी कारवाई करण्यात आली. माफिया ललित पाटील हा दोन ऑक्टोबर रोजी पुण्यातील ससूनमधून पळून गेल्यानंतर त्यांना पळून जाण्यासाठी या दोघांनी मदत केली होती.

आरोपी नाथाराम काळे आणि अमित जाधव ललित पाटीलला पळून जाण्यासाठी मदत करणारा विनय आरानाचा ड्रायव्हर दत्ता डोके याला फोनद्वारे संपर्क केल्या असल्याची माहिती पोलीस चौकशीतून समोर आली आहे. ससून मधून पळाल्या नंतर ललित पाटीलला रावेत पर्यंत विनय आरामाचा ड्रायव्हर दत्ता डोके यांनी खाजगी वाहनातून सोडले होते.या प्रकरणी दोघां पोलिसांची तात्पुरता निलंबनाची कारवाई पुणे पोलिसांनी केली होती. आता मात्र पोलिसांनी कारवाईचा मोठा बडगा उगरत दोघांना थेट शासकीय सेवातून काढून टाकल्याने पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.

संजय राऊत यांच्यावर अहमदनगरच्या कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

रोहित पवार यांनी ट्विट करत परळी तालुक्यात बोगस मतदान झाल्याचा केला आरोप; म्हणाले...

Uddhav Thackeray : 4 जूनला आपल्या देशातलं जुमलापर्व संपतं आहे

काँग्रेस उमेदवार कन्हैया कुमार यांना मारहाण; रोहित पवार यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

ईशान्य दिल्लीत काँग्रेस उमेदवार कन्हैया कुमार यांना मारहाण