महाराष्ट्र

BMC Election 2022 | दिग्गजांना धक्के : महाडेश्वर, यशवंत जाधव, राखी जाधव यांचे वार्ड आरक्षित

मुंबई महापालिकेत ओबीसी आरक्षणासाठीच्या आरक्षणाची सोडत जाहीर झाली. यात अनेक दिग्गजांना धक्का बसला आहे. यामध्ये विश्वनाथ महाडेश्वर, यशवंत जाधव आणि राखी जाधव यांचे वॉर्ड आरक्षित झाले आहेत. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत लढण्यासाठी या दिग्गजांना दुसरे वॉर्ड शोधावे लागणार आहेत.

Published by : Team Lokshahi

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने आज (29 जुलै) OBC आरक्षणासह प्रभाग आरक्षण सोडत सुरू झाली असून नागपूर महापालिकेत निवडणुकीसाठी आरक्षण काढण्यात येणार आहे. ओबीसी महिला आणि खुल्या गटासाठी आरक्षण काढण्यात येणार आहे तर कोल्हापुरात महापालिकेची निवडणूक पहिल्यांदाच त्रिसदस्य प्रभाग रचना पद्धतीने होत आहे. मुंबई महापालिकेत ओबीसी आरक्षणासाठीच्या आरक्षणाची सोडत जाहीर झाली. यात अनेक दिग्गजांना धक्का बसला आहे. यामध्ये विश्वनाथ महाडेश्वर, यशवंत जाधव आणि राखी जाधव यांचे वॉर्ड आरक्षित झाले आहेत. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत लढण्यासाठी या दिग्गजांना दुसरे वॉर्ड शोधावे लागणार आहेत.

आज एससी, एसटी प्रवर्गाचे यापूर्वी घोषित झालेले आरक्षण वगळता 236 पैकी 219 प्रभागांची आरक्षण लॉटरी काढण्यात आली. 219 पैकी 63 प्रभाग हे ओबीसी आरक्षित झाले आहेत. 63 पैकी 53 प्रभागात गेल्या तीन निवडणुकांमधे एकदाही ओबीसी आरक्षण आलेले नसल्याने नियमानुसार 53 वॉर्ड ओबीसी आरक्षितच होतील.

कोणते वॉर्ड OBC आरक्षित?

- राष्ट्रवादीच्या गटनेत्या राखी जाधव यांचा वॉर्ड क्र 130 ओबीसीसाठी आरक्षित.

- शिवसेनेच्या माजी सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव यांचा वॉर्ड 185 ओबीसी महिला आरक्षित

- शिवसेनेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांचा वॉर्ड 217 ओबीसी महिला आरक्षित

- माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचा वॉर्ड क्र. 96 ओबीसी महिला आरक्षित

हे वॉर्ड असणार ओबीसी आरक्षित

ओबीसींसाठी आरक्षित असणाऱ्या वॉर्डमध्ये वॉर्ड क्रमांक 3, 7, 9, 12, 13, 27, 30, 38, 40, 42, 48, 51, 53, 62, 76, 79, 81, 87, 89, 101, 110, 117, 128, 129, 132, 135, 137, 146, 147, 148, 150, 152, 154, 155, 159, 161, 164, 174, 179, 180, 183, 185, 188, 195, 200, 202, 203, 217, 218, 222, 223, 230, 236 यांचा समावेश असणार आहे. या वॉर्डांमध्ये मागील तीन निवडणुकांत ओबीसी आरक्षण नव्हतं. यावेळी ओबीसी आरक्षणासाठी अन्य 10 वॉर्डसाठीदेखील लॉटरी काढण्यात आली. यात 17, 82, 96, 73, 16, 127, 98, 61, 173, 130 या वॉर्डचा समावेश असणार आहे.

आरक्षण सोडत कार्यक्रम

1) सर्वसाधारण महिला प्रभाग, ओबीसीचे ६३ प्रभाग आरक्षित करण्यासाठी २६ जुलै रोजी नोटीस प्रसिद्धी माध्यमात प्रसिद्ध करण्यात आली.

2) सर्वसाधारण महिला प्रभाग, ओबीसीचे ६३ प्रभाग आरक्षित करण्यासाठी सोडत २९ जुलै रोजी सकाळी ११ वाजता वांद्रे, बालगंधर्व रंगमंदिर येथे काढण्यात येणार आहे.

3) आरक्षण सोडतीनंतर त्याची प्रसिद्धी ३० जुलै रोजी प्रसिद्धी माध्यमात करण्यात येणार आहे.

4) ३० जुलै ते २ ऑगस्ट या कालावधीत आरक्षित प्रभागावर हरकती व सूचना नोंदविण्यासाठी मुदत असणार आहे.

5) त्यानंतर त्या हरकती व सूचना निकाली काढून अंतिम अहवाल महापालिका प्रशासन राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवणार आहे. त्यानंतर अंतिम आरक्षण राजपत्रात जाहीर करण्यात येणार आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : हार्बर आणि ट्रान्स हार्बर रेल्वे वाहतूक बंद

Harbour Line : हार्बर आणि ट्रान्स हार्बर रेल्वे वाहतूक बंद

Latest Marathi News Update live : पुण्यात अमली पदार्थांचा सुळसुळाट

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस चांगला जाईल, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य