महाराष्ट्र

Maharashtra Rain: 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील पावसाचा जोर ओसरला आहे. राज्यातील अनेक भागांमधून पाऊस जवळपास गायब झाला आहे.

Published by : Dhanshree Shintre

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील पावसाचा जोर ओसरला आहे. राज्यातील अनेक भागांमधून पाऊस जवळपास गायब झाला आहे. पण, राज्यातील काही भागांमध्ये ढगाळ हवामानासहित तुरळक पाऊस सुरू आहे. यामुळे राज्यातील कमाल तापमानात चढ-उतार सुरू आहे.

मुंबई उपनगर, ठाणे, पालघर या जिल्ह्यांत 26 ते 29 सप्टेंबरदरम्यान जोरदार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे. सोबतच नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्यांत जोरदार अतिजोरदार पावसाची शक्यता जाणवते. तर उर्वरित महाराष्ट्रात मध्यम पावसाची शक्यता जाणवते.

राज्यात पुन्हा पावसाचे आगमन होणार असून काही भागात जोरदार ते अति जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यानुसार 23 सप्टेंबरपासून पावसाचे दमदार कमबॅक होणार आहे. त्यातही 26 आणि 27 ला खान्देश, नाशिक, छ.संभाजीनगर व सभोंवतलातील परिसरात व 28 आणि 29 ला मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात अतिजोरदार पावसाची शक्यता जाणवते.

हवामान खात्याने आजपासून पुढील तीन दिवस महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवली आहे. गेली अनेक दिवस विश्रांती घेतल्यानंतर अखेर कार पुन्हा एकदा पाऊस सक्रिय झाला आहे. हवामान खात्याने आज पासून राज्यात पावसाचा जोर वाढणार असे म्हटले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : हार्बर आणि ट्रान्स हार्बर रेल्वे वाहतूक बंद

Harbour Line : हार्बर आणि ट्रान्स हार्बर रेल्वे वाहतूक बंद

Latest Marathi News Update live : पुण्यात अमली पदार्थांचा सुळसुळाट

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस चांगला जाईल, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य