महाराष्ट्र

सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीची आज मतमोजणी

Published by : Lokshahi News

Sindhudurg District Central Co-operative Bank Election: सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची काल निवडणूक पार पडली. निवडणुकीत केंद्रीयमंत्री नारायण राणे (Narayan Rane) पॅनल आणि महाविकास आघाडीत मोठी चुरस पाहायला मिळाली. संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक मंडळाच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीची आज मतमोजणी होणार. 

19 जागांसाठी 39 उमेदवार रिंगणात होते. दरम्यान, शिवसेनेचे आमदार वैभव नाईक, माजी आमदार आणि भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत कणकवलीत मतदानाचा हक्क बजावला.

2008 पासून बँक राणे यांच्या अधिपत्याखाली होती. मात्र, 2017मध्ये जिल्हा बँकेचे चेअरमन सतीश सावंत यांनी राणे यांच्यापासून वेगळेपण घेत शिवसेनेत गेले. त्यानंतर बँक शिवसेनेच्या ताब्यात दोन वर्ष राहिली.  या निवडणुकीत केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि भाजप महाविकास आघाडीला धक्का देणार की महाविकास आघाडीचे पॅनेल पुन्हा सत्ता ताब्यात ठेवणार याकडे लक्ष लागले आहे. 

केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि आमदार नितेश राणे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहेतर महाविकास आघाडीचे पॅनल प्रमुख आणि विद्यमान चेअरमन सतीश सावंत यांचीही प्रतिष्ठा लागली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Microsoft Company : 25 वर्षांच्या प्रवासाचा पूर्णविराम! Microsoft चा पाकिस्तानमधून काढता पाय; 'हे' कारण समोर

Imtiaz Jaleel On Thackeray Brothers : "दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा फायदा होत होता" इम्तियाज जलील यांचा नेमका टोला कोणाला?

Imtiaz Jaleel On BJP : भाजपने शिवसेना फोडली, आता देशालाही तोडणार? इम्तियाज जलील यांचा आरोप

Uttar Pradesh : लखनऊमध्ये दूधविक्रीत धक्कादायक प्रकार; दुधात थुंकून त्याच दुधाची विक्री, सदर प्रकार CCTV मध्ये कैद