महाराष्ट्र

Deglur Biloli Bypoll Election Result | काँग्रेसचे जितेश अंतापूरकर 38 हजार 126 मतांनी आघाडीवर

Published by : Lokshahi News

नांदेडमधील देगलूर बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीसाठी झालेल्या मतदानानंतर आज मतमोजणी होत आहे. आज सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. काँग्रेसचे जितेश अंतापूरकर 26 व्या फेरीअखेर 38 हजार 126 मतांनी आघाडीवर आहेत.

काँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनानंतर देगलूरमध्ये पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीत एकूण 12 उमेदवार रिंगणात आहेत. असं असलं तरी 3 पक्षात प्रामुख्याने ही लढत होत आहे. या निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. कारण संपूर्ण महिनाभर मंत्री अशोक चव्हाण देगलूर बिलोलीमध्ये तळ ठोकून होते. तर भाजपनेही ही निवडणूक प्रतिष्ठेची केली. भाजपचे अनेक नेते आमदार पदाधिकाऱ्यांनी संपूर्ण देगलूरमध्ये जीवाचं रान करुन प्रचार केला.

अनुसुचित जातीसाठी आरक्षित असणाऱ्या या मतदारसंघात काँग्रेसकडून जितेश अंतापूरकर , भाजपचे उमेदवार सुभाष साबणे तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ. उत्तम रामराव इंगोले निवडणूक रिंगणात आहेत.

▪️सव्वीसावी फेरी 26
1 ) जितेश रावसाहेब अंतापूरकर :- 97157
(इंडियन नॅशनल कॉग्रेस)
2) सुभाष पिराजीराव साबणे :- 59031
(भारतीय जनता पार्टी)
3) उत्तम रामराव इंगोले :- 10466
(वंचित बहुजन आघाडी)
▪️अंतापूरकर 38126 मतांनी आघाडीवर.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

BEST Bus On Special Report : बेस्ट चांगल्या दिवसांच्या वाटेवर, बेस्टच्या उत्पन्नात मोठी वाढ

Latest Marathi News Update live : नांदेडमध्ये परिचारिका संघटनेचे काम बंद आंदोलन

Jitendra Awhad vs Gopichand Padalkar : विधानभवनातील गोंधळावर उद्धव ठाकरेंची तीव्र प्रतिक्रिया; "गुंडांना पास कोणी दिले, याचा शोध घ्या....!

shravan 2025 : महाराष्ट्रात 25 जुलैपासून शुभारंभ, चार श्रावणी सोमवारांसह सणांचा महापर्व, जाणून घ्या...