महाराष्ट्र

सचिन वाझेंची नार्को टेस्ट करा – राम कदम

Published by : Lokshahi News

अंबानी स्फोटक प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक (एपीआय) सचिन वाझे यांना शनिवारी रात्री उशिरा अटक करण्यात आली. या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) करीत आहे. शनिवारी सचिन वाझे यांची प्रदीर्घ चौकशी केल्यानंतर एनआयएने त्यांना अटक केली.उद्योजक मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या घराजवळ स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी सापडली होती. या प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपविण्यात आला आहे. सचिन वाझे यांची जवळपास 12 तास चौकशी केल्यानंतर एनआयएने त्यांना अटक केली.


या प्रकरणावर आता राजकीय स्तरातून प्रतिक्रीया येऊ लागल्या आहेत. या कटात सहभागी असलेल्या लोकांची नावे समोर येण्यासाठी सचिन वाझे यांची नार्को टेस्ट केली जावी, अशी मागणी भाजपाचे नेते राम कदम यांनी केली आहे. भाजपाने केवळ सचिन वाझे यांना अटक करावी, इतकीच मागणी केली होती. मात्र, महाविकासआघाडी सरकारने ही मागणी मान्य केली नाही. सचिन वाझे यांच्याकडे अशी कोणती माहिती आहे की त्यामुळे सरकार आणि नेते अडचणीत येऊ शकतात? यासाठी सचिन वाझे यांनी नार्को टेस्ट झाली पाहिजे, अशी मागणी राम कदम यांन केली.यासोबतच ते म्हणाले की, सचिन वाझे यांची नार्को टेस्ट करून दूध का दूध पानी का पानी होऊ जाऊ दे. सचिन वाझे यांची नार्को टेस्ट झाली नाही तर ठाकरे सरकारचा खरा चेहरा लोकांसमोर येईल, असे राम कदम यांनी म्हटले.

Hair Growth: केस गळतीमुळे त्रस्त आहात? एकदा नक्की वापरून पाहा 'हे' जादुई तेल...

पंतप्रधान मोदी यांच्या सभेत झालेल्या गोंधळावर जयंत पाटील यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

Mahayuti Sabha: आज महायुतीची जाहीरसभा! पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकाच मंचावर

Sanjay Raut : फक्त आमची सभा होऊ नये म्हणून प्रधानमंत्र्यांना बोलवण्यात आलं

Sanjay Raut : प्रधानमंत्री मुंबईत येऊन 25 - 30 सभा घेतात, मग तुम्ही 10 वर्ष काहीच काम केलं नाही ना