मढ गावाची लोकसंख्या तेराशे असून पावसाळ्यात गावातील एखाद्या व्यक्तीचा मृत्यु झाला तर त्या व्यक्तीवर माळरानावर अथवा रस्त्याच्या कडेला , तर उन्हाळ्याच्या दिवसात काळू नदीच्या किनारी खडकावर जाळले जाते. त्यामुळे नागरीकांची प्रचंड गैर सोय होत आहे.
काही वर्षापूर्वी पावसाळ्यामध्ये नदीला पूर आल्याने असच जाळलेले प्रेत नदीमध्ये वाहूनगेल्याचा प्रकार घडला , अनेक वेळा तर पावसाळ्यामध्ये मृत व्यक्ती वरती ताडपत्री टाकून त्याचा आडोसा केला जातो , मात्र आगीमुळे तो जळून गेल्याचे घटना घडल्या आहेत , गावासाठी एकदा स्मशानभूमीसाठी निधी मंजूर झाला होता मात्र जागेअभावी तो परत गेला आहे , जागेअभावी तो प्रश्न अजूनही सुटलेला नाहीये , स्मशान भूमीचा प्रश्न सोडवण्या साठी प्रयत्न सुरू असून तसे झालेच नाही तर वन खात्याने मागणी करू असे जागा उपलब्ध करू ग्रामसेविका शिल्पा भोईर त्यांनी सांगितले.