महाराष्ट्र

नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी इस्त्रोची झेप; 'एक्स्पोसॅट' उपग्रहाचं प्रक्षेपण

Published by : Siddhi Naringrekar

इस्त्रोच्या 'एक्स्पोसॅट' उपग्रहाचं आज प्रक्षेपण झालं. XPoSAT उपग्रह वर्षाच्या पहिल्या दिवशी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून प्रक्षेपित करण्यात आला. हा उपग्रह विश्वातील 50 तेजस्वी स्रोतांचा अभ्यास करणार आहे. तसेच या मोहिमेचा खर्च 9.50 कोटी रुपये असल्याची माहिती मिळत आहे. ही भारताची पहिली समर्पित 'पोलरिमीटर' मोहीम आहे. या मोहिमेतून अवकाशात होणाऱ्या किरणोत्सर्गाचा अभ्यास करण्यात येणार आहे.

प्रक्षेपणानंतर सुमारे 22 मिनिटं, एक्सपोसॅट उपग्रह त्याच्या नियुक्त कक्षेत तैनात होणार आहे. इस्रोनं हे अभियान 2017 मध्ये सुरु केलं होते. यात बसवलेली दुर्बीण रमण संशोधन संस्थेनं बनवली आहे. खगोलीय निर्मितीमागील रहस्य उकलण्याचा प्रयत्न या मोहिमेतून केला जाणार आहे.

एक्सपोसॅट उपग्रह हा पृथ्वीच्या 500 ते 700 किलोमीटरच्या कक्षेत फिरत राहणार आहे.हा उपग्रह 650 किमी उंचीवर पाठवण्यात येणार आहे. पोलिक्स आणि एक्सपेक्ट हे या या उपग्रहामधील दोन पेलोड्स आहेत.

देश तोडण्याची भूमिका घेणाऱ्या काँग्रेसला अमित शहांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले; "भारताचं विभाजन..."

Jayant Patil : भुजबळ साहेब नाराज हे आम्ही ऐकून आहे

Summers: उन्हातून घरी आल्यावर चुकूनही करू नका 'या' गोष्टी...

India Alliance Meeting : बीकेसीत इंडिया आघाडीचं शक्तिप्रदर्शन, मविआ उमेदवारांच्या प्रचारासाठी होणार सभा

Anil Deshmukh : तटकरे साहेब हॉटेलमध्ये आमच्या कार्यकर्त्यांना भेटले; आमच्या संपर्कात जरी ते आले तरी आम्ही त्यांना घेणार नाही