Kolhapur 
महाराष्ट्र

Kolhapur : फुलेवाडी फायर स्टेशन इमारतीचा स्लॅब कोसळून एक ठार, सहा जखमी

अग्निशमन दलाच्या जवानांनी स्लॅबच्या ढिगार्‍याखाली अडकलेल्या कामगारांना बाहेर काढले

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात

  • फुलेवाडी फायर स्टेशन इमारतीचा स्लॅब कोसळला

  • अग्निशमन दलाच्या जवानांनी स्लॅबच्या ढिगार्‍याखाली अडकलेल्या कामगारांना बाहेर काढले

  • या घटनेत एकाचा मृत्यू तर सहाजण जखमी

(Kolhapur) कोल्हापुरातल्या फुलेवाडी येथे फायर स्टेशनच्या इमारतीच्या स्लॅब टाकण्याचे काम सुरू असताना तो कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेत एकाचा मृत्यू तर सहाजण जखमी झाले आहेत.

घटनास्थळी जेसीबीसह यंत्रसामग्रीचा वापर करून अडकलेल्या मजुरांना बाहेर काढण्यात आले. जखमींना तात्काळ सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांनी स्लॅबच्या ढिगार्‍याखाली अडकलेल्या कामगारांना बाहेर काढले.

घटनास्थळी तातडीने पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.रात्रीच्या वेळी फुलेवाडी फायर स्टेशनच्या नूतन इमारतीचे स्लॅब टाकण्याचे काम सुरू असतानाच हा अपघात घडला असून घटनेची माहिती मिळताच तातडीने बचावकार्य सुरू झाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर

MHADA Lottery : 'या' तारखेला 5,354 घरे आणि 77 प्लॉटसाठी संगणकीय सोडत

Donald Trump Tariff : डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा अर्थव्यवस्थेला फटका; अमेरिकेत होणारी 70 टक्के निर्यात बंद

ST Bus Fare Hike : ऐन सणासुदीच्या काळात प्रवाशांच्या खिशाला कात्री लागणार; एसटीची दरवाढ होणार