ST Bus Fare Hike : ऐन सणासुदीच्या काळात प्रवाशांच्या खिशाला कात्री लागणार; एसटीची दरवाढ होणार
थोडक्यात
एसटीची दरवाढ होणार
एसटीच्या तिकिटात 10 टक्के वाढ करण्याचा निर्णय एसटी महामहामंडळाने घेतला
15 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर दरम्यान हा निर्णय लागू असणार आहे
ST Bus Fare Hike : एसटीच्या तिकिटात 10 टक्के वाढ करण्याचा निर्णय एसटी महामहामंडळाने घेतला आहे. आता एसटीने प्रवास करणे महागणार असून प्रवाशांना तिकीट खरेदीसाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.
15 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर दरम्यान हा निर्णय लागू असणार आहे. 14 ऑक्टोबर 2025 च्या मध्यरात्री 12 वाजल्यापासून ही भाडेवाढ लागू करण्यात येणार असल्याचे एसटी महामंडळाने सांगितले आहे. 14 ऑक्टोबर रोजी प्रवास सुरू करणाऱ्या प्रवाशांना जुन्या दरानेच तिकिट आकारण्यात येईल.
शिवनेरी आणि शिवाई बसेस सोडून इतर बसेससाठी ही भाडेवाढ लागू करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. एसटी महामंडळाकडून दिवाळीसाठी 10 टक्के भाडेवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे.