Chhagan Bhujbal 
राजकारण

Chhagan Bhujbal : मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

(Chhagan Bhujbal) राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली.

Published by : Siddhi Naringrekar

(Chhagan Bhujbal) राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली. राजभवनात भुजबळ यांचा शपथविधीचा सोहळा पार पडला. गेल्या काही दिवसांपासून मंत्रिपद न मिळाल्यामुळे छगन भुजबळ नाराज पाहायला मिळालं होतं. यावेळी भुजबळांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचीही भेट घेतली होती. छगन भुजबळांच्या शपथविधीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह महायुतीतील मंत्री आणि प्रमुख नेते उपस्थित होते.

मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर छगन भुजबळांनी प्रतिक्रिया दिली आहे. छगन भुजबळ म्हणाले की, "महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार त्याचबरोबर आमच्या पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे. यांचे सुद्धा मी मनापासून आभार मानतो. या देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेब आणि अमितभाई शाह यांचेसुद्धा आभार मानतो. आता बाकी ज्या काही जबाबदाऱ्या असतील त्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ठरवतील.

"अनेक खाती सांभाळलेली आहेत. आता जे काही खातं मला मिळेल त्याप्रमाणे निश्चितपणे काम करु. आमच्या नाशिक जिल्ह्यात आणि इतर ठिकाणी सुद्धा अवकाळी पावसामुळे प्रचंड नुकसान झालेलं आहे. यावर मुख्यमंत्री आणि इतर सर्वांशी बोलणार आहे. त्यातून शेतकऱ्यांना काय मदत करता येईल, तातडीने मदत करणे गरजेचं आहे असं मला वाटते. त्यासाठी मी प्रयत्न करेन." असे छगन भुजबळ म्हणाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Crop Insurance Update : शेतकऱ्यांच्या लबाडीसाठी त्यांना थेट काळ्या यादीत स्थान; पीकविमा योजनेसंदर्भात नवीन घोषणा

Chandrakant Khaire On Nishikant Dubey : निशिकांत दुबे यांच्या वक्तव्यावरून चंद्रकांत खैरे संतापले, म्हणाले, "आमच्या पैशांवर तुमचं झारखंड आणि..."

Nishikant Dubey : "कोण कुत्रा आणि कोण वाघ..." मुंबईत हिंदी भाषिक वादावरून निशिकांत दुबे यांची ठाकरे बंधूंवर जहरी टीका

Latest Marathi News Update live : मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत, जनसुरक्षा समिती प्रमुख तसेच महसूलमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक