सध्या महाराष्ट्रातील राजकारण मोठ्या प्रमाणात चर्चेत आले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळसाहेब ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याच्या चर्चा मोठ्या प्रमाणात सुरु आहेत. त्यांच्या एकत्र येण्याच्या चर्चावर अनेक राजकारणी नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सुषमा अंधारे, संदीप पाटील यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
आशातच आता या सर्व प्रकरणावर रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत सूचक वक्तव्य केले आहे. त्यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे की, "मराठी अस्मितेला नख लावू पाहणाऱ्या #महाराष्ट्रद्रोही शक्तीच्या विरोधात ठाकरे कुटुंब एकत्र येत असेल तर मराठी मनासाठी हा सुवर्णक्षण असेल. केवळ ठाकरे कुटुंबानेच नाही तर #सर्वच कुटुंबांनी #महाराष्ट्रधर्म जपण्यासाठी एकत्र यायला हवं आणि यातच महाराष्ट्राचं हीत आहे".
रोहित पवार यांच्या ट्वीटकडे सगळ्यांचेच लक्ष वेधले आहे. त्यामुळे ठाकरे बंधु एकत्र आल्यास महाराष्ट्राचं हित असल्याचे ते म्हणाले आहेत. दरम्यान रोहित पवार यांनी मराठी माणसाचा विचार करून एकत्रित येणाच्या विचारांचे समर्थन केल्याचेही दिसून येत आहे.