Raj Thackeray : भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरुन व्यंगचित्र काढत राज ठाकरेंची टीका
थोडक्यात
आशिया चषक 2025 मध्ये 14 सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना झाला
भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरुन व्यंगचित्र काढत राज ठाकरेंची टीका
'भारत पाकिस्तान सामन्यात नेमकं कोण जिंकलं? आणि कोण पराभूत झालं?'
(Raj Thackeray) आशिया चषक 2025 मध्ये 14 सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना झाला यामध्ये भारताने पाकिस्तानवर 7 विकेट्सने विजय मिळवला. मात्र अनेक देशवासीयांना हा पाकिस्तानविरुद्धचा सामना भारताने खेळू नये अशी भावना व्यक्त केली होती.
तसेच यावर अनेक प्रतिक्रिया देखील आल्या होत्या. याच पार्श्वभूमीवर आता मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी या सामन्यावर प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरे यांनी व्यंगचित्रातून टीका केली आहे. त्यांच्या व्यंगचित्रामध्ये केंद्र सरकार आणि आयसीसीवर थेट भाष्य केले आहे.
राज ठाकरे यांनी गृहमंत्री अमित शाह आणि आयसीसी अध्यक्ष जय शाह यांचे प्रतिकात्मक चित्र काढले असून त्यामध्ये “अरे बाबांनो उठा… आपण जिंकलो, पाकिस्तानी हरले…” अशी टिप्पणीही त्यांनी त्याच्यात केली आहे.
व्यंगचित्रातून राज ठाकरे यांनी पहलगाम हल्ला आणि क्रिकेट सामन्यातील विसंगती अधोरेखित केली आहे. या व्यंगचित्रामध्ये राज ठाकरे यांनी “नक्की कोण जिंकला? आणि नक्की कोण हरलं?” असे देखील लिहिले आहे. सोशल मीडियावर हे व्यंगचित्र सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून, अनेकांनी या पोस्टवर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.