अहमदनगर: कर्जत तालुक्यातील पाटेगाव खंडाळा एमआयडीसी साठी आमदार रोहित पवार (Rohit Pawar)यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांना पत्र पाठवले आहे. रोहित पवारांनी कर्जतच्या पोस्टातून हिंदीमध्ये हे पत्र पाठवले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पाटेगाव खंडाळा एमआयडीसीसाठी आमदार रोहित पवार आक्रमक झाल्याच दिसत आहे. त्यामुळे आता थेट मोदींना पत्र पाठवून भाजप आमदार राम शिंदे यांच्यावर त्यांनी निशाणा साधला आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रातील मंत्री आपल्या भाषणात नेहमी सांगतात की सबका साथ सबका विकास पण नोकरी देण्यासाठी, मोठ्या इंडस्ट्री येण्यासाठी तुम्ही प्रयत्न करता का? आणि याबाबत महाराष्ट्र का वेगळा ठेवला आहे, असा थेट प्रश्न आमदार रोहित पवारांनी या पत्राद्वारे नरेंद्र मोदी यांना केला आहे.