राजकारण

“भाजपचे ‘टवाळ’ पुढारी महाराष्ट्राच्या बदनामीची सुपारी घेतल्याप्रमाणे बेबंद वागतायत”

Published by : Shweta Chavan-Zagade

नुकताच जगभरात प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या ऑस्कर पुरस्कार (Oscar 2022) सोहळ्यात निवेदक क्रिस रॉकला (Chris Rock) कानाखाली मारल्यानंतर अभिनेता विल स्मिथने (Will Smith) सोशल मीडियाद्वारे माफीनामा जारी केला आहे. दरम्यान अभिनेता विल स्मिथचा संर्दभ घेत सामनाच्या अग्रलेखातून भाजपावर निशाणा साधण्यात आला आहे.

भाजपचे 'टवाळ' पुढारी महाराष्ट्राच्या बदनामीची सुपारी घेतल्याप्रमाणे बेबंद वागत आहेत. मर्यादांचे भान राखायला ते तयार नाहीत. कॉमिक क्रिस रॉकनेही मर्यादा सोडली, तेव्हा भरमंचावर त्यास थप्पड खावी लागली. त्या थपडेनंतर तो कोलमडला. हेसुद्धा जगभरात दिसून आले. भाजपचे 'देशी' क्रिस रॉक गेल्या अडीच वर्षांपासून उठसूट महाविकास आघाडीच्या बाबतीत घाणेरड्या पद्धतीने 'नौटंकी' करीत आहेत. स्वतः भ्रष्टाचाराने बरबटले असताना दुसऱ्याकडे बोटे दाखवून थयथयाट करीत आहेत. असल्या नौटंकीस एक दिवस कानशिलात बसणारच! आता ही मंडळी 'क्रिस रॉक'ला पद्मविभूषण देणार की दिल्लीतून त्यास विशेष सुरक्षा पुरवणार, ते पाहावे लागेल, अशी टिका सामनाच्या अग्रलेखातून भाजपावर करण्यात आली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Uddhav Thackeray on Eknath Shinde : "एका गद्दाराने काल 'जय गुजरात' अशी घोषणा केली" उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेवर निशाणा

Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात चिमुकलीने जिंकली मनं ! राज ठाकरेंना म्हणाली 'I love You तर...

Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : सुखद ! काका-पुतण्याच्या गळाभेटीने महाराष्ट्र सुखावला, आता पुढे काय होणार ? याकडे सगळ्यांचेच लागले लक्ष

Sushil Kedia Apologizes : मराठीबद्दल वादग्रस्त विधानानंतर अखेर सुशील केडियाने मागितली माफी