Sushil Kedia Apologizes : मराठीबद्दल वादग्रस्त विधानानंतर अखेर सुशील केडियाने मागितली माफी
Sushil Kedia Apologizes : सुशील केडियाने मराठीबद्दल वादग्रस्त वक्तव्ये केली होती. आणि त्याचा राग म्हणून आज मनसे सैनिकांनी त्यांना आपला इंगा दाखवत त्यांच्या ऑफिसाची तोडफोड केली. प्रसिद्ध गुंतवणूकदार आणि शेअर बाजार विश्लेषक सुशील केडियाच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या कार्यालयावर तोडफोड केली आहे.मनसेचा हा रोष पाहिल्यावर अखेर मुजोर सुशील केडिया याने एक्स वर पोस्ट करत राज ठाकरे यांची माफी मागितली.
"माझ्या ट्विट ला वेगळ्या पद्धतीने घेतले गेले. 30 वर्षे मुंबईमध्ये राहून मला इतके मराठी प्रभावीपणे बोलता येत नाही. इथे महाराष्ट्रामध्ये ज्यांचा जन्म झाला त्यांना जितक्या प्रभावीपणे मराठी बोलता येत तितक्या प्रभावीपणे मला बोलता येणार नाही. यामुळे मी खूप कमी वेळा मराठी भाषेचा वापर करतो. माझ्याकडून काही चुकीचे बोलले जाऊ नये यासाठी मी ही मराठी भाषा बोलणे टाळत असतो. पण त्यामुळे जे काही प्रेशर माझ्यावर निर्माण केले जात होते त्यामुळे अक्षरशः माझा जीव गुदमरत होता. राज ठाकरेंबद्दल मला नेहमीच आदर आहे. नेहमी मी त्यांच्याबद्दल सकारात्मकच बोलतो. ज्यांना मराठी येत नाही अश्या लोकांना घाबरवण्यापेक्षा तुम्ही त्यांना ती भाषा शिकण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे. माझे ट्विट हे केवळ फ्रस्टेशन मुळे केले गेले होते. मात्र राज ठाकरेंबद्दल मला नेहमीच आदर आहे आणि राहणार. आपल्या लोंकांनीच आपल्या लोकांवर दबाव टाकला की ही अशी चूक होते. मी माझी चूक मान्य करतो. आताचे जे मराठीबद्दलचे तणावाचे वातावरण आहे ते शक्य त्या लोकांनी दूर करावे की जेणेकरून सगळ्यांना मराठी भाषा आत्मसात करता येईल. या शब्दात सुशील केडियाने राज ठाकरेंची अखेर माफी मागितली.