येत्या काळात अजितदादा मुख्यमंत्री होणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. यावर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. यातच स्वराज्य पक्षाचा काल मुंबईत मेळावा पार पडला. यावेळी संभाजीराजे बोलत होते.
याच पार्श्वभूमीवर आता स्वराज्य पक्षाचे नेते आणि माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी मोठं विधान केलं आहे. छत्रपती संभाजीराजे म्हणाले की, स्वराज्य पक्ष कुणाला फसवणार नाही. आम्ही जनतेची सेवा करण्यासाठी आलो आहोत. अजितदादा मुख्यमंत्री होऊ शकत नाही. सगळं ठरलेलं आहे, असं सांगतानाच हिंदुत्वाची युती आणि राजकीय युती हे काय असते? यातील फरक शोधण्यासाठी मला डिक्शनरी घ्यायची आहे.
तसेच हे तिघे लढणार कसे? आम्हाला बरं आहे, त्यातली आमच्याकडं येतील. हे सगळं गणित लोकसभेसाठी आहे. सगळं झालं की हे सगळे मोठ्या काकाकडे जाणार. मी त्यांच्यावर बोलणार नाही. कारण ते माझे संस्कार आहेत. असे संभाजीराजे म्हणाले.