थोडक्यात
उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या भेटीला शिवतीर्थ निवासस्थानी दाखल
ठाकरे बंधूंमध्ये 30 मिनिटांपासून बैठक सुरु
पालिका निवडणुकीसंदर्भात बैठक असल्याची माहिती
(Uddhav Thackeray - Raj Thackeray ) उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थवर दाखल झाले आहेत. उद्धव ठाकरे यांच्यासोबत संजय राऊत आणि अनिल परब देखील असल्याची माहिती मिळत आहे. गणेशोत्सवादरम्यान ठाकरे बंधूंची भेट झाली होती.
त्यानंतर आज पुन्हा उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी आले आहेत. ही दुसरी भेट असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. शिवतीर्थवर ठाकरे बंधूंमध्ये 30 मिनिटांपासून बैठक सुरु असल्याची माहिती मिळत असून पालिका निवडणुकीसंदर्भात ही बैठक असल्याचे बोलले जात आहे.