थोडक्यात
ऐन दसऱ्याच्या तोंडावर फुलांचे दर वाढले
फुलांचे दर शंभरी पार
पावसामुळे फुलांच्या उत्पादनात घट
(Marigold Flower Prices) दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर फुलांचे भाव वाढले आहेत. परतीच्या पावसामुळे झेंडू उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. मुसळधार पावसामुळे शेतीवर मोठा परिणाम झाला आहे.
झेंडूसोबत इतर फुलांच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. ऐन दसऱ्याच्या तोंडावर फुलांचे दर वाढले आहेत, फुलांचे दर शंभरी पार झाल्याचे चित्र सध्या बाजारात पाहायला मिळत असून संपूर्ण महाराष्ट्राला पावसाने दिलेल्या तडाख्याने फुलशेतीही अडचणीत सापडली आहे.
सणासुदीच्या निमित्ताने फुलबाजार ग्राहकांच्या गर्दीने फुलून जातात. फुलांच्या खरेदीसाठी मोठी गर्दी होते. मुसळधार पावसामुळे फुलांची आवक कमी झाली आहे. सणासुदीच्या काळात झेंडूच्या फुलांची मागणी वाढते