Diwali Bonus : दिवाळीपूर्वी सरकारकडून 8 लाख सरकारी कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर; जाणून घ्या
दिवाळी म्हटली की, कर्मचाऱ्यांना पहिला येणारा विचार म्हणजे बोनस... दरम्यान यंदा दिवाळी ही कर्मचाऱ्यांसाठी अधिक सुखदायक असणार आहे. उत्तर प्रदेशातील योगी सरकारने दिवाळीपूर्वी राज्यातील कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी मोठी घोषणा केली आहे.
केंद्र सरकारच्या घोषणेनंतर, दिवाळीपूर्वी 3,400 ते 7,000 पर्यंतचे बोनस जाहीर केले जातील. उत्तर प्रदेशातील मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 8 लाख कर्मचाऱ्यांसाठी 3,400 ते 7,000 रुपयांपर्यंतचा बोनस जाहीर केला आहे. सरकार 1,000 कोटी रुपयांचे बजेट वाटप करेल, ज्याचा थेट फायदा राज्य कर्मचाऱ्यांना होईल.
हा आदेश ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत जारी होण्याची अपेक्षा आहे. याप्रक्रियेसाठी वित्त विभाग सरकारची मान्यता घेईल. त्यानंतर कागदपत्रे तयार करण्याचा आदेश जारी करेल. हा बोनस राजपत्रित राज्य कर्मचाऱ्यांनाच नाही तर दैनंदिन वेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही होणार आहे. या बोनसची रक्कम त्यांच्या खात्यात जमा केली जाईल.
या बोनसचा फायदा राजपत्रित राज्य कर्मचारी आणि दैनिक वेतन आणि कार्यभार कर्मचाऱ्यांना होईल. त्याचसोबत मिळालेल्या माहितीनुसार, सरकार महागाई भत्ता आणि मदत भत्त्यातही वाढ जाहीर करू शकते. यावेळी महागाई भत्ता तीन टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा आहे.