संदीप गायकवाड | वसईत एका भात गिरणी मालकाला दोन महिन्याचं तब्बल ८० कोटीच बिल पाठवण्यात आले होते. हे बिल पाहून गिरणी मालकाला मोठा शॉक बसला होता. या वाढीव वीज बिलावर लोकशाहीने मोहीम चालवली आहे. या मोहिमेद्वारे लोकशाही न्यूजने महावितरणाला चांगलाच दणका दिला होता. त्यामुळे महावितरणाने आपल्या चुकीची दुरुस्ती करून गिरणी मालकाला सुधारित बिल पाठवले आहे. तसेच एका कर्मचा-याला निलंबित केले आहे.
लोकशाही न्युज चॅनेलने वाढीव वीज बिलावर मोहीम चालवून महावितरणाच्या भोंगळ कारभाराचा पाढा जनतेसमोर मांडला होता. त्याचबरोबर जनतेला वाढीव वीज बिलापासून दिलासा दिला होता. अशाच प्रकारे वसईच्या एका भात गिरणी मालकाला दोन महिन्याच तब्बल ८० कोटीच वीज बिल आलं होतं. यावेळी महावितरणाने मीटर वाचन यंञणेत नोंद करताना चूक झाल्याच मान्य केले. तर देयक दुरुस्ती झाल्याशिवाय ग्राहकाला वीज बिल देऊ नका अशा सूचना ही एजन्सीला देण्यात आल्या होत्या.
वीज बिल ग्राहकांच्या हातात गेल्यानं महावितरणानं संबंधित लिपिकाला निलंबित केलं आहे. तर सहाय्यक लेखापाल आणि उपविभागीय अधिका-यांना कारणे दाखवा नोटीस दिली आहे. तसेच चुकिचे देयक वितरित केल्याप्रकरणी मीटर वाचन घेणा-या एजन्सीवर तर गुन्हाच दाखल केला असल्याच महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता सुरेंद्र मुंगारे यांनी सांगितलं आहे. तसेच नाईक यांना सुधारीत ८६ हजार ८९० रुपयाचं वीज बिल घरी जावून देण्यात आल्याचही सांगण्यात आलं आहे.