महाराष्ट्र

Mumbai Local MEGA BLOCK : आज 24 तासांचा मेगा ब्लॉक

Published by : Lokshahi News

आज (रविवारी ) 24 तासांचा मेगा ब्लॉक असणार आहे. मध्य रेल्वेकडून ठाणे-दिवा मार्गावर पुन्हा एकदा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. सध्या या मार्गावर पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचं काम सुरू आहे. यासाठी रविवारी तब्बल 24 तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.


मेगा ब्लॉक दरम्यान प्रवाशांनी सहकार्य करावे असे आवाहन मध्य रेल्वेकडून करण्यात आले आहे. ब्लॉकमुळे अनेक गाड्यांच्या वेळेमध्ये देखील बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामुळे प्रवाशांचे मात्र चांगलेच हाल होणार आहे.


डेक्कन एक्सप्रेस, मुंबई-जालना-मुंबई जनशताब्दी एक्सप्रेस, अमरावती -मुंबई एक्सप्रेस, डेक्कन क्विन, मुंबई-अमरावती एक्सप्रेस, पंचवटी एक्सप्रेस, मुंबई -नांदेड राजधानी एक्सप्रेस, मुंबई आदिलाबाद नंदीग्राम एक्सप्रेस, सेवाग्राम एक्सप्रेस, या सर्व गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.


सीएसएमटीकडे जाणाऱ्या कल्याणहून सुटणाऱ्या अप आणि जलद गाड्या कल्याण आणि मुलुंड दरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत.सर्व लोकल नियोजित वेळेपेक्षा दहा मिनिटे उशीराने पोहोचतील. मुलुंडहून 2 जानेवारी रोजी 5.05 पासून ते 3 जानेवारी मध्यरात्री 1.15 पर्यंत मुलुंड व कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर धावतील.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Raj Thackeray - Uddhav Thackeray : ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचा विजयी मेळावा; ठाकरे बंधू काय बोलणार? साऱ्यांचं लक्ष

Latest Marathi News Update live : मनसे - शिवसेनेचा आज मुंबईत विजयी मेळावा

आजचा सुविचार

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींच्या कामांना यश मिळण्याची शक्यता , कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य