Raj Thackeray - Uddhav Thackeray : ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचा विजयी मेळावा; ठाकरे बंधू काय बोलणार? साऱ्यांचं लक्ष
(Raj Thackeray - Uddhav Thackeray ) राज्य सरकारने हिंदी सक्तीचे दोन्ही जीआर रद्द केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी विजयी मेळाव्याची घोषणा केली आहे. ही विजयी सभा आज 5 तारखेला होणार आहे. या मेळाव्याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
याच पार्श्वभूमीवर आता मुंबईत बॅनरबाजी करण्यात आली आहे. मुंबईतील वरळी डोम येथे ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांचा भव्य एकत्रित मेळावा होणार आहे. विजयी मेळाव्याच्या निमित्ताने उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र एकाच व्यासपीठावर पाहायला मिळणार आहेत.
आज सकाळी 10 वाजता वरळी डोममध्ये हा विजयी मेळाव्याचा कार्यक्रम पार पडणार आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंचे एकत्र फोटो असलेले बॅनर मुंबईत पाहायला मिळत आहे. आज ठाकरे बंधू या जाहीर मेळाव्यातून महाराष्ट्रातील जनतेला काय संबोधित करणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
असा असेल ठाकरेंचा 'विजयी मेळावा'
मेळाव्यात केवळ ठाकरे बंधूंची भाषणे होणार, तर इतर पक्षांचे अध्यक्ष आल्यास केवळ पक्षाध्यक्षांचीच भाषणं होतील
व्यासपीठावर फक्त पक्षाध्यक्षांनाच स्थान दिलं जाईल. इतर सर्व नेते व्यासपीठासमोर बसतील
आदित्य ठाकरे, संजय राऊत आणि अमित ठाकरेही व्यासपीठाच्या खालीच बसणार. सर्व नेत्यांचा सन्मान केला जाईल, अशी आसनव्यवस्था असेल
मुंबईत शक्य तिथं एलईडी स्क्रीन लावले जाणार, कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण लोकांना पाहता येणार. तर वरळी डोममध्ये गर्दी झाल्यास डोमच्या गॅलरीही कार्यकर्त्यांसाठी खुल्या केल्या जाणार.
वरळी डोम परिसरात मोकळ्या जागेत अतिरिक्त शेड टाकून बैठक व्यवस्था केली जाणार