महाराष्ट्र

नांदेड महानगरपालिका; उपमहापौर पदी अब्दुल गफार सत्तार, किशोर स्वामी स्थायी समिती सभापती पदी बिनविरोध

Published by : Lokshahi News

कमलाकर बिरादार, नांदेड | नांदेड वाघाळा महापालिकेच्या उपमहापौर पदी काँग्रेस पक्षाचे अब्दुल गफार अब्दुल सत्तार यांची, तर स्थायी समितीच्या सभापती पदी, किशोर स्वामी यांची बिनविरोध निवड झाली आहे.जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी या निवडीची अधिकृत घोषणा केलीय.

नांदेड वाघाळा महापालिकेच्या उपमहापौर पदासाठी व स्थायी समितीच्या सभापती पदासाठी प्रत्येकी एकच उमेदवारी अर्ज दाखल झाला होता त्यामुळे फक्त औपचारिकता शिल्लक होती.काँग्रेस पक्षाचे अब्दुल गफार अब्दुल सत्तार यांची उपमहापौर पदी , तर स्थायी समितीच्या सभापती पदी, किशोर स्वामी यांची बिनविरोध निवड झाली आहे.

महापालिकेत काँग्रेसची एकहाती सत्ता आहे.पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या निर्देशानुसार हे अब्दुल गफार आणि किशोर स्वामी यांची वर्णी लागलीय.महापालिकेची सार्वत्रिक निवडणुक 10 महिन्यावर येऊन ठेपली आहे.त्यापार्श्वभुमीवर तरुणांना ही संधी देण्यात आली.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचं उद्धव ठाकरेंवर जोरदार टीकास्त्र; म्हणाले...

शिरूर मतदारसंघाच्या ईव्हीएम स्ट्राँगरुममधील सीसीटीव्ही 24 तास बंद

Shambhuraj Desai : 4 तारखेला जेव्हा निकाल लागेल तेव्हा चांगल्या मताधिक्याने माननीय नरेश म्हस्के साहेब निवडून येतील

"पहिल्या चार टप्प्यातच आम्ही महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीचा सुफडा साफ केला "; उपमुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा दावा

मोठी बातमी! घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मुख्य आरोपी भावेश भिंडेला उदयपूरमधून अटक