Bhavesh Bhinde Arrested
Bhavesh Bhinde Arrested

मोठी बातमी! घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मुख्य आरोपी भावेश भिंडेला उदयपूरमधून अटक

घाटकोपरमध्ये पूर्व द्रुतगती मार्गाजवळ असलेलं महाकाय होर्डिंग पेट्रोल पंपावर कोसळलं होतं. या दुर्घटनेत आतापर्यंत १६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलीय.
Published by :

अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यानं सोमवारी मुंबई धुमाकूळ घातला होता. वाऱ्याच्या जोरदार तडाख्यामुळं घाटकोपरमध्ये पूर्व द्रुतगती मार्गाजवळ असलेलं महाकाय होर्डिंग पेट्रोल पंपावर कोसळलं होतं. या दुर्घटनेत आतापर्यंत १६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलीय. या दुर्घटनेतील मुख्य आरोपी भावेश भिंडे गेल्या काही दिवसांपासून पोलिसांना चकवा देत फरार झाला होता. दरम्यान, आज मुंबई पोलिसांनी आरोपी भावेश भिंडेला राजस्थानच्या उदयपूरमधून अटक केलीय.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com