महाराष्ट्र

… ती गोष्ट नक्षलवाद्यांना कळते पण सरकारला नाही

Published by : Lokshahi News

विनोद गायकवाड(दौंड)

मराठा समाजावर झालेल्या अन्यायाची गोष्ट माओवादी नक्षलवाद्यांना कळते मात्र या मुर्दाड सरकारला कळत नाही अशी टीका विनायक मेटे यांनी दौंड मध्ये केलीय. नक्षलवाद्यांनी पत्र लिहून मराठा आरक्षणाला समर्थन दिले ते जास्त गंभीर आहे, समर्थन देण्याच्या नावाखाली नक्षलवादी यांनी आपले जाळे पसरवण्याचा प्रयत्न केला आहे.

मराठा तरुणांना आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. या सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा समाजाचे आरक्षण गेले आहे. त्यामुळे मराठा समाजाच्या गरीब विद्यार्थ्यांवर आघात आणि अन्याय झालेला आहे. असे विद्यार्थी गांजलेले असतील ते विद्यार्थी नक्षलवाद्यांच्या जाळ्यामध्ये ओढले गेले तर ग्रामीण भागाचे चित्र फार वेगळ होऊ शकत याचा विचार सरकारने केला पाहिजे.


नक्षलवादी ग्रामीण भागामध्ये जाळ पसरवायला लागले आणि चांगले विद्यार्थी या संघटनांना जाऊन मिळाले तर ही बाबा गंभीर होऊ शकते.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

NEET-UG 2025 : निकालांविरुद्धची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

Latest Marathi News Update live : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज पुणे दौऱ्यावर

Peanut Kadhi Recipe : आषाढीच्या उपवासाला तयार करा चविष्ट शेंगदाण्याची कढी

गरमागरम डाळ, भात अन् त्यावर तूप घालून खाण्याचे 'हे' फायदे तुम्हाला माहिती आहेत का? जाणून घ्या