बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान ड्रग्स प्रकरणात अडकल्यानंतर राजकारण चांगलेच तापू लागले आहे. नबाव मलिकांनी आर्यन खान कारवाईवरून एनसीबी आणि भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांवर आता एनसीबीनं पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तर दिलंय.
एनसीबीकडून ज्ञानेंदर सिंग आणि समीर वानखेडे यांनी नवाब मलिकांचे आरोप खोडून काढलेत.प्रभाकर साईल, मनीष भानुशाली, आदिल उस्मानी, अर्पणा राणे, प्रकाश बहादूर हे वैयक्तिक साक्षीदार आहेत. जे आरोप आमच्यावर होत आहेत ते चुकीचे आहेत, याचा थेट संबंध यापूर्वी केलेल्या कारवाईशी आहे. कोकेन, चरस आदी ड्रग्स सापडलेत, असंही एनसीबीनं स्पष्ट केलंय.
2 ऑक्टोबरला आम्ही कारवाई केली, त्यावेळी वेगवेगळे ड्रग्स सापडले, त्यावेळी आठ लोकांना अटक केली. मोहक जैस्वालच्या माहितीनंतर अब्दुल कादीर शेखला अटक केली, एमडी ड्रग्ज सापडलं. त्यानंतर 3 ऑक्टोबरला गोरेगाव मुंबईला ही कारवाई केली, श्रेयस नायरला अटक केली. मनीषकडे हायड्रोफोनिक वीड सापडलं. अब्दुल कादिर याला 3 ऑक्टोबरला अटक केली, त्यानंतर श्रेयस नायर याला अटक केली, त्यानंतर अमीन साहू , दर्या या दोघांना अटक केली. हे जहाजावर प्रवासी होते. जहाजावर अनेक कारवाई केली. आतापर्यंत चार ठिकाणी धाडी टाकल्यात, मनीष राजगडिया हा शिपवर गेस्ट होता, तिथे चरस सापडलं. इवेंट मॅनेजमेंटमध्ये या सगळ्यांना अटक करण्यात आली. सारे पंचनामे कायद्याने बनवलेत. स्वतंत्र साक्षीदार आहेत. काही आरोप लावण्यात आलेत, ते बिनबुडाचे आहेत. आमच्यावर जे आरोप केलेत ते चुकीचे आहेत, असंही स्पष्टीकरण एनसीबीनं दिलंय.