भूपेश बारंगे | वर्ध्यातील नागपूर अमरावती राष्ट्रीय महामार्ग सहावर आज सकाळी 9 वाजताच्या सुमारास तळेगांव कडे जाणाऱ्या दुचाकीला देवावाडी जवळ मागून ट्रकने धडक दिली. यात एक जण ठार झाला असून दोघे जण गंभीर जखमी झाले आहे.
तळेगांव येथील सिडीएट कंपनीत मध्ये दुचाकी क्र.महा.४९ ए एक्स ७८८९ जात असताना मागून येणारा ट्रक क्र.डी एन ०९ यू९६७८ देवावाडी जवळ जोरदार धडक दिली. यात ट्रकच्या समोरील भागात दुचाकी अडकल्याने काही अंतरावर दुचाकी घासत गेली. यात दुचाकी तिघे जण जात असताना यातील राहूल डिग्रसे जागीच ठार झाला आहे. तर राजू कुंभरे ,मारोती धारपुरे गंभीर जखमी झाले. जखमींना टोल नाक्यावर अंबुलन्सने सारवाडी प्राथमिक आरोग्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू आहे. घटनास्थळावरून ट्रक चालक पसार झाला आहे. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन घटनेचा पंचनामा करण्यात आला आहे. वृत्त लिहेपर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.