महाराष्ट्र

डोंबिवलीत यंदा पुन्हा रंगणार भव्य रासरंग, डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या माध्यमातून नवरात्रोत्सवाचे आयोजन

Published by : Sagar Pradhan

अमजद खान | डोंबिवली: डोंबिवली शहरात आयोजित केला जाणारा सर्वात मोठा रास रंग नवरात्र उत्सव दोन वर्षांच्या खंडानंतर यंदा पुन्हा आयोजित करण्यात आला आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या 'डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन'च्या माध्यमातून डोंबिवलीत हा भव्य रास गरबा आयोजित केला जातो. तरुणांसह अबाल - वृद्धांमध्ये या उत्सवाची उत्सुकता असते. सुमारे एक लाख नागरिक या उत्सवात प्रत्यक्ष सहभागी होत असतात. यंदा 26 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर दरम्यान हा उत्सव रंगणार आहे.

विकास कामांच्या माध्यमातून शहराला आकार देणारे कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे विविध सांस्कृतिक कार्यक्रमांतून संस्कृती टिकवून ठेवण्याचे कार्यही करत असतात. कला, नृत्य, संगीत यांचा अनोखा संगम असलेला अंबरनाथचा शिव मंदिर आर्ट फेस्टिवल देशभरात प्रसिद्ध झाला आहे. त्याचप्रमाणे डोंबिवली शहरात आयोजित केला जाणार भव्य रास रंग हा कार्यक्रमही डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या माध्यमातून गेल्या काही वर्षांपासून आयोजित केला जातो. उपनगरातील सर्वात मोठा नवरात्रोत्सव म्हणूनही या रास रंग या कार्यक्रमाकडे पाहिले जाते. तरुण- तरुणींसह अबाल आणि ज्येष्ठ नागरिकही या उत्सवाची प्रतीक्षा करत असतात.

मराठमोळ्या भोंडल्याला गुजराती बांधवांच्या गरब्याचा साज या रासरंग उत्सवाच्या निमित्ताने मिळतो. दरवर्षी एक लाखांहून अधिक जण या उत्सवात हजेरी लावत असतात. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या या उत्सवाला मराठी, हिंदी सिने, नाट्य आणि टीव्ही विश्वातील अनेक प्रसिद्ध, कलाकार, गायक, गीतकार, संगीतकार हजेरी लावत असतात. गेल्या दोन वर्षात करोनाच्या सावटामुळे रासरंग उत्सव रद्द करण्यात आला होता. मात्र यंदा ठाणे जिल्ह्याचे लाडके माननीय एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदी विराजमान झाल्यामुळे नव्या उत्साहात आणि जल्लोषात या रासरंग उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षी प्रमाणे डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन आणि नवदुर्गा युवा मंडळाच्या माध्यमातून २६ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर या दरम्यान डी.एन.सी. शाळेच्या पटांगणावर हा उत्सव रंगणार आहे.

या नऊ दिवसात तुषार सोनिग्रा यांच्या बिट १६ चे वाद्यवृंद कार्यक्रमात संगीत संयोजन करतील. तर अर्चना महाजन, दिलेश दोषी, सेजल शहा, पंकज कक्कड, धर्मेश जोशी, कौशिक गाडा या कलावंताचे सादरीकरण होणार असून त्याला प्रसिद्ध निवेदिका शलाका हिच्या सुत्रसंचालनाची जोड मिळणार आहे. राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या रासरंग उत्सवाला हजेरी लावनार आहेत. तर राज्यातील महत्वाचे नेते, मंत्री, कलावंत या उत्सवाला हजेरी लावणार आहेत. गरबाप्रेमींनी मोठ्या कालावधीनंतर होणाऱ्या डोंबिवलीतील सर्वात मोठ्या गरबा उत्सवात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केले आहे. या उत्सवात विविध स्पर्धा होणार असून आकर्षक बक्षिसांची लयलूट सहभागी होणाऱ्यांना करता येणार आहे.महिलांसाठी भोंडला तसेच कुंकूमाकर्चन सुद्धा पार पडणार आहे पत्रकार परिषद घेऊन कार्यक्रमाची माहिती देण्यात आली पत्रकार परिषदेत जिल्हाप्रमुख गोपाल लांडगे शहर प्रमुख राजेश मोरे,उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, दीपेश म्हात्रे, रमेश म्हात्रे, रणजित जोशी उपस्थित होते.

पुण्यातील रेसकोर्स मैदानात PM मोदींचं मोठं विधान, म्हणाले; "देशाच्या पहिल्या बुलेट ट्रेनमध्ये..."

शरद पवारांनी PM मोदींसह अमित शहांवर फुंकली 'तुतारी', म्हणाले; "जो महागाई वाढवतो, त्यांना..."

Harbour Railway: तब्बल ४ तासांनंतर हार्बर रेल्वेची वाहतूक पूर्वपदावर

पंतप्रधान मोदींचा इंडिया आघाडीला थेट इशारा, साताऱ्यात म्हणाले, "मी जिवंत आहे, तोपर्यंत..."

IPL मध्ये जॅक्सने दाखवली 'विल'पॉवर! ख्रिस गेलचा दहा वर्षांपूर्वीचा 'हा' विक्रम मोडला