मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांच्या गटाला मोठा धक्का
Team Lokshahi

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांच्या गटाला मोठा धक्का

पालघरचे शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव संख्ये यांचा युती सरकारला पाठींबा
Published by :
shweta walge
Published on: 

चेतन ननावरे, मुंबई : पालघरचे शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव संख्ये आणि पालघर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सचिन पाटील यांच्यासह पालघर जिल्ह्यातील अनेक जेष्ठ शिवसैनिकांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन या शासकीय निवासस्थानी भेट घेऊन युती सरकारला आपला पाठींबा जाहीर केला.

यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांना त्यांच्या भावी राजकीय आणि सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या, तसेच यापुढे पालघर जिल्हयाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि शिवसेनेच्या विस्तारासाठी जिल्ह्यात कार्यरत राहण्याचे निर्देश दिले.

वैभव संख्ये यांनी युती सरकारला पाठींबा देणे हा पालघर जिल्ह्यात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला मोठा धक्का आहे. तर मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्यनेते एकनाथ शिंदे यांचे हात अधिक बळकट झाले आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांच्या गटाला मोठा धक्का
बारामतीमध्ये घडी बंद करण्याचा प्रयत्न, बावनकुळे यांची टीका
logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com