महाराष्ट्र

PM Narendra Modi : मला पण लहानपणी अशा घरात रहायला मिळायला हवं होतं; मोदींना अश्रू अनावर

Published by : Siddhi Naringrekar

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार उपस्थित आहेत. सोलापूरच्या नगर कुंभारी येथील पंतप्रधान आवास योजनेंतर्गत असंघटित कामगारांसाठी बांधण्यात आलेल्या घरकुलांचे लोकार्पण मोदींच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमात बोलत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, २२ जानेवारीला आपले भगवान श्रीराम त्यांच्या घरात विराजमान होणार आहेत. हे पवित्र कार्य करण्याचे पुण्य मला मिळाले आहे. ते पूर्ण करेल असा विश्वास आहे. आज १ लाखांहून अधिक लोकांचा गृहप्रवेश होत आहे. माझा आनंद अनेक पटीने वाढणार आहे. मला पण लहानपणी अशा घरात रहायला मिळालं हवं होतं, असं म्हणत मोदींना अश्रू अनावर झाले.

गरीबांची स्वप्न हाच आमचा संकल्प आहे. पूर्वीचे सरकार फक्ती गरीबी हटावोच्या घोषणा द्यायचे. गरिबांनी मोठी स्वप्न पाहावीत. आमच्या सरकारच्या काळात 25 कोटी लोक गरिबीतून मुक्त झाले. देशातील सर्वात मोठी श्रमिक सोसायटी तयार झाली आहे. मला हे पाहून वाटले. कदाचित मलाही अशा पक्क्या घरात. राहण्यास मिळाले असते. मोदी की गॅरंटी म्हणजे गॅरंटी पूर्ण होण्याची गॅरंटी. गेल्या १० वर्षांत ३० लाख कोटींहून अधिक रुपये लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केले. थेट खात्यात पैसे जमा करत आम्ही १० लाख बोगस लाभार्थी कमी केले. आम्ही रेशनकार्ड संदर्भातल्या अडचणीही दूर केल्या. गरिबीतून मुक्त झालेल्यांना बळ द्यावे लागेल. माझं आणि सोलापूरचे जुनं नात आहे. भाजपाने गरिबांसाठी अनेक योजना आणल्या.

वन नेशन वन प्रोडक्ट ही मोहीम आपण हाती घेत आहोत. मेड इन इंडिया उत्पादन वाढवायचे आहे. केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ सोलापूर वासियांना होत आहे. लवकरच भारत जगातील टॉप ३ अर्थव्यवस्थांमध्ये सामील होईल. मी देशाला गॅरंटी दिली आहे. येत्या पाच वर्षांत भारतीय अर्थव्यवस्था प्रथम ३ मध्ये असेल. तुमच्या सहकार्याने मी गॅरंटी देत आहे. असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

Patanjali: बाबा रामदेव पुन्हा अडचणीत; पतंजलीवर मोठी कारवाई

Dengue: राज्यात मागील पाच वर्षांत डेंग्यूच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ

RCB VS CSK: आरसीबीने 27 धावांनी विजय मिळवून प्लेऑफमध्ये केली दमदार एन्ट्री

Megablock: रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! मध्य रेल्वेवर 15 दिवस मेगाब्लॉक; तर काही गाडया रद्द

साताऱ्यातील मिनी काश्मीर आणि महाबळेश्वरमध्ये बरसला अवकाळी पाऊस