महाराष्ट्र

Salman Khan : लॉरेन्स बिष्णोई गँगकडून पुन्हा धमकी; सलमान खानच्या सुरक्षेत वाढ

बॉलिवूडचा भाईजान सलमान खानला पुन्हा एकदा लॉरेन्स बिष्णोई गँगकडून धमकी मिळाली आहे.

Published by : shweta walge

बॉलिवूडचा भाईजान सलमान खानला पुन्हा एकदा लॉरेन्स बिष्णोई गँगकडून धमकी मिळाली आहे. गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने पुन्हा धमकी दिल्याने भाईजानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी सलमानला Y+ सुरक्षा देण्यात आली आहे.

रविवारी बिश्नोईने फेसबुक पोस्टच्या माध्यमातून गिप्पी ग्रेवालच्या कॅनडातील निवासस्थानाबाहेर झालेल्या गोळीबाराची जबाबदारी घेतली होती. इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, फेसबुक पोस्ट करणारा हा भारताबाहेरील आहे. पोस्ट शेअर करत त्याने लिहिलं होतं की,"तुम्ही सलमान खानला तुमचा भाऊ मानता, पण आता वेळ आली आहे की तुमचा ‘भाऊ’ येऊन तुम्हाला वाचवेल. हा संदेश सलमान खानसाठीही आहे - दाऊद तुम्हाला वाचवेल अशा भ्रमात राहू नका.. तुम्हाला कोणीही वाचवू शकणार नाही".

पोस्टमध्ये पुढे लिहिलं आहे,"सिद्धू मूसवालाच्या मृत्यूबद्दलच्या तुझ्या नाट्यमय पोस्टने कोणाचं लक्ष वेधून घेतलेलं नाही. तो कसा होता आणि त्याचे गुन्हेगारी संबंध होते हे आम्हा सर्वांना माहीत आहे. तुम्ही आता आमच्या रडारवर आहात. हा ट्रेलर आहे, लवकरच सिनेमा प्रदर्शित होईल. . तुम्हाला पाहिजे असलेल्या कोणत्याही देशात पळून जा, पण लक्षात ठेवा, मृत्यूला हा निमंत्रण देण्याची गरज नसते".

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : मराठीसाठी भांडणाऱ्यांना गुंड म्हणत असतील तर आम्ही गुंड आहोत - उद्धव ठाकरे

Raj-Uddhav Thackeray Family Member Vijayi Melava : सहकुटुंब सहपरिवार..; ठाकरे बंधूंचे कुटुंब एकाच व्यासपीठावर

Latest Marathi News Update live : व्यावसायिक सुशील केडियाने मागितली माफी

Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : उद्धव-राज ठाकरे एकत्र येण्यावर मराठी कलाकारांची भावनिक प्रतिक्रिया