(Student Bus Pass ) राज्यातील शाळा आजपासून सुरू होत आहे. यातच विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. विद्यार्थ्यांना आता शाळेतच एसटीचा पास मिळणार आहे. राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) आता विद्यार्थ्यांना प्रवास पास थेट त्यांच्या शाळा-महाविद्यालयांमध्ये वितरित करणार आहे.
परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या निर्देशानुसार 'एसटी पास थेट तुमच्या शाळेत' मोहीम राबविण्यात येत आहे. यापूर्वी विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना एसटीच्या पास केंद्रांवर जाऊन रांगेत उभे राहून पास घ्यावा लागत होता.
मात्र आता मात्र शाळा आणि महाविद्यालयांनी दिलेल्या नावांच्या यादीनुसार, संबंधित विद्यार्थ्यांना पास थेट त्यांच्या शैक्षणिक संस्थेत एसटी कर्मचारी पोहोचवतील अशी माहिती मिळत आहे.