महाराष्ट्र

राज्यातील शाळा सुरु होणार !

Published by : Lokshahi News

महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण विभागानं राज्यातील कोरोनामुक्त भागातील 8 वी ते 12 वीचे वर्ग सुरु करण्याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण विभागानं राज्यातील कोरोनामुक्त भागातील 8 वी ते 12 वीचे वर्ग सुरु करण्याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र शासनानं याबाबत एक शासन निर्णय जारी केला आहे. कोरोनामुक्त क्षेत्रातील ग्रामपंचायती आणि स्थानिक स्वराज संस्थांच्या ठरावांनी शासन निर्णयात जारी करण्यात आलेल्या निकषांच्या आधारे पहिल्या टप्प्यात इयत्ता 8 वी ते 12 वीचे वर्ग सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहे. (Maharashtra Education department issue GR for starting classes of 8 to 12 in Covid free area)

राज्य सरकार कडून शाळांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत

  • संबंधित शाळेतील शिक्षकांची राहण्याची व्यवस्था शक्यतो त्याच गावात करण्यात यावी, किंवा त्यांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर न करण्याबाबत दक्षता घ्यावी.
  • शाळेत व शाळेच्या परिसरात स्वच्छता व आरोग्यदायी परिस्थिती सतत राखणे
  • शाळेत हात धुण्यासाठी सुविधा उपलब्ध करुन देणे.
  • Thermometer, जंतूनाशक, साबण पाणी इत्यादी आवश्यक वस्तुंची उपलब्धता तसेच शाळेची – स्वच्छता व निर्जंतुकीकरण स्थानिक प्रशासनाने (ग्रामीण व शहरी) सुनिश्चित करावी.
  • thermometer हे calibrated contactless infrared digital thermometer असावे.
  • एखाद्या शाळेत क्वारंटाईन सेंटर असल्यास स्थानिक प्रशासनाने ते इतर ठिकाणी स्थानापन्न करावे.
  • स्थानिक प्रशासनाने अशा शाळेचे हस्तांतरण शाळा व्यवस्थापनाकडे करण्यापूर्वी त्याचे पूर्णत: निर्जंतुकीकरण करावे.
  • क्वारंटाईन सेंटर इतर ठिकाणी नेणे शक्य नसल्यास शाळा खुल्या परिसरात किंवा इतर ठिकाणी भरवावी.
  • संबंधित शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी कोविड- १९ साठीची RTPCR / RAPID ANTIGEN चाचणी करावी.
  • वर्गखोली तसेच स्टाफ रुम मधील बैठक व्यवस्था शारीरिक अंतर (Physical Distancing) च्या नियमांनुसार असावी.
  • वर्गामध्ये एका बाकावर एक विद्यार्थी याप्रमाणे बैठक व्यवस्था असावी.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Tuljapur News : तुळजापुरात आव्हाडांच्या कारसमोर भाजप कार्यकर्त्याचा राडा!

Aadhaar Card : सर्वोच्च न्यायालयाच्या निरीक्षणानंतर आधारच्या भूमिकेवर नव्या चर्चेंना सुरुवात

Ajit Pawar : स्वातंत्र्यदिनी मांसविक्रीच्या बंदीवर अजित पवारांचा विरोध; नेमकं काय म्हणाले...

Priyanka Gandhi X Post : प्रियांका गांधींनी युद्धासंदर्भात केलेल्या ट्विटमुळे इस्रायलचा पारा चढला; काय आहे 'त्या' ट्विटमध्ये?