छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj)प्रागतिक विचारांचा प्रत्यय त्यांच्या जीवनातून आणि कारभारातून येतो. शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj)जीवनातील अनेक प्रसंगाचे कुतूहल तमाव शिवप्रेमींना असते. महाराजांकडे एकूण 3 तलवारी होत्या. या तलवारी शाही तलवारी असत. त्याचा वापर युद्धात होत नव्हता. महाराजांकडे जगदंबा, तुळजा आणि भवानी या तीन तलवारी असल्याचे इतिहासकार सांगतात. त्यातील शहाजीराजांनी दिलेल्या तलवारीचे नाव महाराजांनी तुळजा असे ठेवले होते. (bhavani-talwar)
भवानी तलवार
शिवाजी महाराजांनी ज्या भवानी तलवारीच्या साक्षीने स्वराज्य स्थापन झालं ती तलवार इतिहासातून गायब झाली. तिचे मुळ वर्णन इतिहासकारांना सांगता आले नाही. इतिहासकारांच्या मते भवानी तलवार कशी होते ते सांगितल जात परंतु ठामपणे ती ओळखता येत नाही. मुख्यमंत्रीपदी ए.आर. अंतुले यांनी सांगितले की, भवानी तलवार इंग्लडला आहे आणि ती आपण परत आणू. परंतु अजूनही ती आली नाही.
भवानी तलवार भवानी मातेने दिली का ?
भवानी मातेने छत्रपती शिवाजी महाराजांना तलवार दिली का, असा शोध घेत असता शिवभारत या काव्याचा आधार मिळतो. बखरी आणि काव्यात शिवरायांचे वर्णन करताना भवानी तलवारीचा उल्लेख आहे. त्यात म्हटले आहे की, साक्षात तुळजाभवानी मातेने दर्शन दिले आणि म्हणाली, राजा मी तुझी तलवार होवून राहिली आहे. भवानी तलवार स्वराज्यात आली कशी ? याबद्दल वेगवेगळे दाखले दिले जात असतात. भवानी तलवार भारतात बनलेली नाही तर ती स्पेन, पोर्तूगाल इथे तयार करण्यात आल्याच म्हटले जाते. ७ मार्च १६५९ रोजी महाराज कोकण दौऱ्यावर होते. यावेळी बांदा नावाच्या बंदरानजीक ओहोटीमध्ये पोर्तुगीजांचे जहाज अडकले होते. या जहाजावर खेम सावंत यांनी हल्ला केला. त्या हल्यामध्ये त्यांनी ही तलवार मिळाली. पोर्तुगीज लोक त्या काळात राज्याला नजराणा देण्यासाठी किंवा विक्रीसाठी अशी शस्त्रे आणत होते. ही तलवार त्यापैकीच एक असल्याच म्हटले जाते. त्या जहाजाचे कॅप्टन दि ओक फर्नांडिस यांची ती तलवार असल्याचे म्हटले जाते.
तलवारीसंदर्भात दुसरा प्रवाद असा आहे की, तलवार शिवाजी महाराजां पोर्तुगीजांकडून थेट मिळाली होती. खेम सावंत यांनी ती भेट दिली असले अशी शक्यता आहे. कारण खेम सावंत स्वराज्याचे हितचिंतक नव्हते. ते आदिलशाहीचे सेवक होते. शरणागती पत्करल्यानंतर त्यांनी महाराजांना ही तलवार पेश केली, असे म्हटले जाते.
भवानी तलवार कशी होती
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातल्या अनेक गूढ विषयांवर अद्याप संशोधन चालत आहे. त्यापैकी भवानी तलवार कशी होती? हे आज कोणीच सांगू शकत नाही. १८७५ साली इंग्लडचे राजपुत्र प्रिन्स ऑफ वेल्स सातवे एडवर्ड भारतात आले त्यावेळी कोल्हापूरच्या शाहू छत्रपतींनी त्यांना दोन तलवारी दिल्या. त्याचे नाव तुळजा आणि जगदंबा होते. त्या दोन्ही तलवारी आजही इंग्लडच्या बंकिंगहम राजवाड्यात असल्याचे म्हटले जाते. यासंदर्भात भारतीय इतिहासकारांनी इंग्लंडमध्ये असलेल्या तलवारींमध्ये भवानी तलवार नाही, अशी पुष्टी केली आहे. इंग्लडच्या ब्रिटीश म्युझियमच्या डग्लस बॅरेट यांनी देखील इथे भवानी तलवार नसल्याचे लेखी कळवले.
भवानी तलवार गेली कुठे..?
रायगडच्या पाडाव्यानंतर औरंगजेबाच्या हाती ही तलवार लागली. शाहू महाराजांची सुटका केल्यानंतर औरंगजेबाने काही वस्तू त्यांना परत केल्या. त्यात भवानी तलवारचा समावेश असल्याचे सांगण्यात येते. शाहू महाराजांकडे हीतलवार आली, हे खरे असते तर ती तलवार छत्रपती उदयन महाराज यांच्याकडे असायला हवी होती.