अनाथांची माय' अशी ओळख असलेल्या सिंधूताई सपकाळ यांचे निधन झालं आहे. गॅलेक्सी हॉस्पीटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. या घटनेने संपुर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिंधुताई सकपाळ यांना ट्विटरच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली आहे. मोदींनी एक ट्विट करत सिंधुताईंच्या निधनावर तीव्र शोक व्यक्त केला आहे.
सामाजिक कार्याचा सन्मान म्हणून सिंधुताई सपकाळ यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तो फोटोही पंतप्रधान मोदींनी शेअर केला आहे.
पद्मश्री पुरस्काराने सन्मानित सिंधुताई यांनी अनेक खडतर प्रसंगाना तोंड देत हजारो अनाथ मुलांचा सांभाळ केला. अनेक अनाथ मुलांच्या त्या आधार बनल्या.
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सुद्धा सिंधूताईंना श्रद्धांजली वाहीली आहे. ज्येष्ठ समाजसेविका व 'अनाथांची माय' अशी ओळख असलेल्या सिंधूताई सपकाळ यांच्या निधनाची बातमी समजली. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. पद्मश्री पुरस्काराने सन्मानित सिंधूताई यांनी अनेक खडतर प्रसंगाना तोंड देत हजारों अनाथ मुलांचा सांभाळ केला.