Beed
महाराष्ट्र
Beed : धक्कादायक! बीडमध्ये तरुणाला अमानुष मारहाण, VIDEO
एका तरुणाला बेदम मारहाण करत अपहरण केल्याचा प्रकार
थोडक्यात
बीडमधून आणखी एक धक्कादायक घटना समोर
एका तरुणाला बेदम मारहाण करत अपहरण केल्याचा प्रकार
बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
(Beed) बीडमध्ये आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे. एका तरुणाला बेदम मारहाण करत अपहरण केल्याचा प्रकार समोर आला आहे. अमानुषपणे मारहाण करतानाचा व्हिडीओ समोर आला आहे.
बीड शहराजवळील चराठा फाटा या ठिकाणाहून या तरुणाचे अपहरण केल्याची प्राथमिक माहिती मिळत असून ननवरे नावाच्या युवकाला बेदम मारहाण करताना दहा ते पंधरा तरुण दिसत आहेत. त्या तरुणाला बेदम मारहाण करत एका जीपमध्ये टाकताना दिसत आहे.
याप्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून बीड ग्रामीण पोलिसांचे पथक या तरुणाचा शोध घेत आहे.अद्याप युवकाचा शोध लागलेला नाही.