बांगलादेशमध्ये हिंदूवर अत्याचार करण्यात येत आहे, तर अमरावतीसह राज्यात देखील बांगलादेशी नागरिक लपून- छपून राहत असल्याचा धक्कादायक आरोप अमरावती जिल्ह्याचे ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुनील खराटे यांनी केला आहे.
ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांची भेट घेत अमरावतीत राहणाऱ्या बांगलादेशींना हाकलून लावा अन्यथा शिवसेना स्टाईल चोप दिला जाईल असा इशारा ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुनील खराटे यांनी दिला आहे. ज्या पद्धतीने बांगलादेशमध्ये हिंदू अत्याचार सुरू आहे त्या पद्धतीने अमरावती जिल्ह्यात राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांना पीटाळून लावा, कारण येथेही मोठ्या प्रमाणावर बांगलादेशी नागरिक राहतात ही कारवाई पोलिसांनी केली नाही तर ठाकरे गटाचे शिवसैनिक रस्त्यावर उतरून शिवसेना स्टाईलने बांगलादेशी नागरिकांना हाकलून लावेल असा इशारा सुनील खराटे यांनी दिला आहे.
दरम्यान, बांगलादेशामधील हिंदूंवर अन्याय आणि अत्याचार होत आहेत. तेथे हिंसाचाराच्या घटनाही मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. बांगलादेशातील जमावाने हिंदूंच्या घरांची तोडफोड केली. इस्कॉनचे चिन्मय कृष्णदास प्रभु यांना अन्यायकारक अटक करण्यात आली. त्यांची लवकर सुटका होण्यासह तेथील हिंदूंवर होणार्या अत्याचाराच्या विरोधात सकल हिंदु समाजाच्या वतीने महाराष्ट्रात ठिकठिकाणी मोर्चे काढण्यात आले.