मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेववर भीषण अपघात झाल्या असून मुंबईकडे येणाऱ्या भरधाव कोंबड्यावाहू टेम्पोची एका बसला धडक बसली आणि त्यानंतर मागची पाच वाहनांची आपापसात धडक झाली अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. दोन टेम्पो, कार, खाजगी बस आणि ट्रेलर अशी सहा वाहन एकमेकांना आदळली आहेत. यामध्ये आत्तापर्यंत ३ प्रवाशांचा मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले आहेत.
अपघातातील मृतांमध्ये कोंबड्यावाहू टेम्पोतील एक व्यक्ती आणि कारमधील व्यक्तीचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. सोमवारी सकाळी सहाच्या सुमारास हा अपघात घडला आहे. रस्त्याचे काम सुरु असल्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती स्थानिकांकडून दिली जात आहे.
खोपोलीदरम्यान झालेल्या या अपघातात टेम्पो-ट्रेलरच्यामध्ये एका कारचा चक्काचूर झाला असून कारमधील दोन प्रवासी जखमी झाले आहे. अपघातास्थळी बचाव पथकाने धाव घेत अपघातग्रस्तांचे मदत कार्य सुरु केले आहे. यातील जखमींना उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.