Akola Crime Team Lokshahi
महाराष्ट्र

आयफोन मागितल्याने रागाच्या भरात वडिलांनीच केली पोटच्या मुलाची हत्या

कोल्हापूरमधील कागल तालुक्यातील बामणी गावच्या हद्दीत ही घटना घडली.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

कोल्हापूर : येथून धक्कादायक बातमी समोर येत आहे. आयफोन मागितल्याने रागाच्या भरात वडिलांसह भावानेच तरुणाचा खून केल्याची घटना घडली आहे. अमरसिंह थोरात असं खून झालेला तरुणाचं नाव आहे. कागल तालुक्यातील बामणी गावच्या हद्दीत ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. वडील दत्ताजीराव थोरात व भाऊ अभिजित थोरात अशी आरोपींची नावे आहेत.

सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील गोटखिंडी गावचे थोरात रहिवासी आहेत. अमरसिंह थोरात दहा वर्षांपासून पुण्यात एमपीएससीचा अभ्यास करत होता. त्यानंतर घरातूनच त्याचा अभ्यास सुरू होता. मात्र यश न आल्याने कोल्हापुरात अमरसिंहने वकिलीचं शिक्षण सुरू केले होते. सातत्याने अपयश आल्याने अमरसिंह दारुच्या आहारी गेला होता. यामुळे घरात वारंवार भांडणं होत होती.

तर अमरसिंहने आयफोन घेण्यासाठी वडिलांकडे दीड लाखांची मागणी केली होती. परंतु, नकार दिल्याने अमरसिंहचे वडिलांसोबत मोठा वाद झाला. याच रागातून वडिलानी घरात अमरसिंहच्या डोक्यात लोखंडी पाईप घातला. प्रचंड रक्तस्राव झाल्याने अमरसिंहचा मृत्यू झाला. यामुळे वडिलांनी घाबरून मृतदेह रस्त्याशेजारी टाकला. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांना तपासाची चक्रे फिरवत 24 तासात छडा लावला. व दोन्हीही आरोपींना अटक केली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Mediclaim : विमा कंपन्यांकडून आरोग्य विमा क्लेमसाठी 24 तासांची अट शिथिल

Ajit Doval : 'तुमच्याकडे भारतात झालेल्या नुकसानीचा एकतरी फोटो आहे का?'; अजित डोवाल यांचे विदेशी माध्यमांना खुले आव्हान

Latest Marathi News Update live : विधान परिषदेत जनसुरक्षा विधेयकावरून गदारोळ

KL Rahul : कर्णधार आणि उपकर्णधार अनुपस्थितीत केएल राहुलकडे टीम इंडियाची धुरा