(Pune Rain ) पुण्यात पावसाने दमदार हजेरी लावली असून, पुणे शहर आणि परिसरात पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. या संततधार पावसामुळे पुणे जिल्ह्यातील धरणसाठ्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. खडकवासला प्रकल्पात सध्या, 5.77 अब्ज घनफूट (टीएमसी) म्हणजेच सुमारे 19.81 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. हा साठा गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल दोन टीएमसीने अधिक आहे.
हवामान विभागाने पुढील 48 तासांसाठी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. खडकवासला धरणाची पाणीपातळी वाढल्यामुळे काही वेळात धरणाच्या सांडव्यावरून 2000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येणार आहे. हा विसर्ग मुठा नदीत सोडण्यात येणार असून नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
नदीच्या काठावरील गाड्या व जनावरं सुरक्षित स्थळी हलवावीत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. मुळा-मुठा नदीच्या कडेला असलेल्या अपार्टमेंट्समधील नागरिकांनीही सावधगिरी बाळगावी, असा इशारा देण्यात आला आहे. पुलांवरून ये-जा करताना देखील काळजी घेणं आवश्यक आहे.