(Pune) ऐन पावसाळ्याच्या तोंडावर पुणेकरांना पाणीकपातीचा सामना करावा लागणार आहे. 3 जुलै रोजी देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांमुळे पुणे शहरातील अनेक भागांचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. यानंतर शुक्रवारी (4 जुलै) पाणीपुरवठा असला तरी तो कमी दाबाने होणार असल्याची माहिती पुणे महानगरपालिकेच्या पाणी विभागाने दिली आहे.
यावेळी पाणीपुरवठा बंद असलेले प्रमुख भाग म्हणजे – दत्त नगर, टेल्को कॉलनी, आमराई (आंबेगाव बुद्रुक), दळवी नगर, वाघजाई नगर, अचल फार्म परिसर, पंचम नगर, वडार वस्ती, संतोष नगर, अंजली नगर, महावीर कुंज, वंडर सिटी, सेक्शन सोसायटी, गुरुद्वारा परिसर, आंबेगाव खुर्द गाव, तसेच जांभूळवाडी रोड व आजूबाजूचा संपूर्ण परिसरामध्ये पाणीपुरवठा बंद असणार आहे.
या भागांमध्ये गुरुवारी पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहणार असून, शुक्रवारी पाणी कमी दाबाने असणार आहे. प्रामुख्याने कात्रज आणि त्यास लागून असलेल्या परिसरात पाणीकपात होणार आहे.