यंदा नागपंचमीचा सण आज म्हणजेच (21 ऑगस्ट 2023 रोजी) आहे. हिंदू धर्मात नागपंचमीला विशेष महत्त्व आहे. या दिवशी घरोघरी प्रतिकात्मक नागाची पूजा करून नागदेवतेला प्रसन्न केले जाते. या दिवशी राज्यात अनेक ठिकाणी प्रतिकात्मक नागाची पूजा करतात.
नागपंचमीच्या दिवशीही घरात भाकरी, चपाती केली जात नाही, असे का होते ते जाणून घेऊया. नागपंचमीला कढईत अन्न शिजवू नये. मान्यतेनुसार, रोटी बनवण्यासाठी वापरण्यात येणारी लोखंडी तवा हा सापाचा फणा मानला जातो. लोखंडी जाळी ही सापाच्या फणीची प्रत मानली जाते. म्हणूनच नागपंचमीच्या दिवशी तवा आगीवर ठेवला जात नाही.
ब्रह्मपुराणानुसार नागपंचमीच्या दिवशी पूजेसाठी ब्रह्मदेवाने नागांना वरदान दिले आहे. या दिवशी नागाची पूजा करण्याचा विधी आहे. त्यांची पूजा केल्याने राहू-केतू जन्म दोष आणि कालसर्प दोषांपासून मुक्ती मिळते. म्हणूनच या दिवशी इतर काही काम करण्यास मनाई आहे. उदाहरणार्थ, कोणत्याही कामासाठी जमीन खणू नका. या दिवशी शिवणकाम, भरतकाम करू नये, कारण नागपंचमीला चाकू, सुई या धारदार आणि टोकदार गोष्टींचा वापर अशुभ मानला जातो.
हिंदू धर्मात पौराणिक काळापासून सापांना देवांप्रमाणे पुजले जाते. हा सण साजरा करण्यामागे काही पौराणिक कथा आहेत त्यापैकीच एक आपण जाणून घेऊया. एका शेतकऱ्याच्या नांगराच्या फाळाने नागिणीची तीन पिल्ले मृत्युमुखी पडली व त्यामुळे नागदेवतेचा कोप झाला अशीही समजूत प्रचलित आहे. त्यामुळे या दिवशी शेतकरी आपल्या शेतात नांगरत नाही. कोणीही खणत नाही, घरी कोणीही भाज्या चिरायच्या नाही, तवा वापरायचा नाही व कुटायचे नाही असे काही नियम पालन करण्याची प्रथा आहे.
वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही