ताज्या बातम्या

Pune : पुण्यातील 7 नव्या पोलीस स्टेशनचं आज उद्घाटन होणार

पुण्यातील 7 नव्या पोलीस स्टेशनचं आज उद्घाटन होणार आहे.

Published by : Siddhi Naringrekar

पुण्यातील 7 नव्या पोलीस स्टेशनचं आज उद्घाटन होणार आहे. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. दुपारी दोन वाजता शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात हा कार्यक्रम होणार आहे.

नवीन पोलीस ठाण्यांतील कामकाजासाठी 816 पोलीस कर्मचारी उपलब्ध करून देण्यात येणार असून आठवडाभरात सर्व 7 पोलीस स्टेशन सुरू होणार असल्याची माहिती मिळत आहे.

पुणे शहराला आता नवे सात पोलीस स्टेशन मिळणार असून या आधी पुणे शहरात 32 पोलीस स्टेशन होते आता त्यांची संख्या 39 झाली आहे.

यामध्ये आंबेगाव, नांदेड सिटी, बाणेर, खराडी, वाघोली, काळेपडळ आणि फुरसुंगी ही नवीन पोलीस स्टेशन सुरू होणार आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

आजचा सुविचार

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींना धनलाभ होण्याची शक्यता, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

PM Narendra Modi : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील सर्वाधिक सन्मानित व्यक्ती

Malnourished Children : राज्यात कुपोषित बालकांचा आकडा धडकी भरवणारा ; महिला आणि बालविकास मंत्र्यांची माहिती