ताज्या बातम्या

‘लम्पी’चा वाढता धोका लक्षात घेत मुंबई महापालिकेचा मोठा निर्णय

देशभरात सध्या लम्पी आजाराने थैमान घातल्याचं पाहायला मिळतंय. अनेक जनावरे या रोगाने दगावताय. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांची काळजी घेणं महत्वाचं आहे. हा रोग संसर्गजन्य असल्याने एका जनावराकडून दुसऱ्या जनावराला याची लागण होतेय.

Published by : Siddhi Naringrekar

देशभरात सध्या लम्पी आजाराने थैमान घातल्याचं पाहायला मिळतंय. अनेक जनावरे या रोगाने दगावताय. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांची काळजी घेणं महत्वाचं आहे. हा रोग संसर्गजन्य असल्याने एका जनावराकडून दुसऱ्या जनावराला याची लागण होतेय. राज्यात लम्पीचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य सरकारही आता अलर्ट मोडवर आल्याचं पाहायला मिळतंय कारण, लम्पीमुळे उत्त्तरेकडील राज्यांमध्ये हजारो जनावरांचा मृत्यू झालाय त्यामुळे पशुपालकांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय. महाराष्ट्रावरही हे संकट दूर नाहीये राज्याच्या अनेक भागात जनावरांना या आजाराची लागण झालीय.

राज्यातल्या शेतक-यांपुढे उभ्या ठाकलेल्या लम्पी आजाराच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मोठी घोषणा केली आहे. लम्पीमुळे दगावलेल्या गुरांसाठी मुख्यमंत्र्यांनी मदत जाहीर केली आहे. ही मदत देताना NDRFचे निकष लावले जाणार आहेत. मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेतला गेल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. तसेच राज्यात जनावरांना लम्पी आजाराची लागण होत असल्यानं मुंबई महापालिकेकडूनही खबरदारी घेतली जातेय. मुंबईभरातील सर्वच गोशाळा, तबेले, गोठयांची तपासणी करण्याचा निर्णय बीएमसीनं घेतलाय. यामध्ये जनावरांमध्ये लक्षणांची तपासणी करण्यात येणार असून अस्वच्छता आढळल्यास संबंधितांना नोटीस बजावण्यात येणार आहे.

1929ला दक्षिण आफ्रिकेत या रोगाचा शोध लागला अर्थातच प्रथमतः आढळून आला. 2012-13 नंतर लम्पी रोग भारतात आढळला. भारतात राजस्थान, पंजाब, गुजराज, हरियाणा, हिमाचल प्रदेशात हा आजार आढळला. आता महाराष्ट्रातही याचा प्रादुर्भाव झालाय. हा आजार फक्त जनावरांमध्ये आढळतो. बाधित जनावरांच्या संपर्कात आलं तरी मनुष्याला या आजाराची लागण होत नाही. त्यामुळे बाधित जनावरांवर उपचार करताना घाबरून जाण्याचं काहीच कारण नाही.

लम्पी आजार म्हणजे काय ?

लम्पी हा एक त्वचारोग आहे.

प्रामुख्याने जनावरांमध्ये लम्पी आढळतो.

1929ला दक्षिण आफ्रिकेत या रोगाचा शोध.

2012-13नंतर लम्पी रोग भारतात आढळला.

महाराष्ट्रात गडचिरोलीत या रोगाची सुरुवात.

लम्पी हा संसर्गजन्य रोग.

एका जनावराकडून दुसऱ्या जनावराला लागण.

गायींना लम्पी रोगाची जास्त लागण.

कमी वयाच्या जनावरांमध्ये रोगाची तीव्रता जास्त.

संकरित जनावरांमध्ये या रोगाचा जास्त प्रादुर्भाव.

बाधित जनावरांचा मृत्यू झाला खोल खड्डयात मृतदेहाची विल्हेवाट लावावी.

मृत जनावरांच्या ज्या खड्ड्यात पुरणार तिथे चुन्याची पावडर टाकावी.

लम्पी आजाराची लक्षणे कोणती?

जनावराला ताप येतो.

जनावरे चारा-पाणी कमी करतात.

एक-दोन दिवसात अंगावर गाठी येतात.

या गाठी संपूर्ण शरीरावर पसरतात.

जनावरांच्या पायाला सूज येते.

परिणामी जनावरे दगावतात.

वेळेत उपचार केल्यास आजाराचा धोका कमी.

जनावरांमध्ये या आजाराची लक्षणे आढळल्यास जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी किंवा जनावरांच्या डॉक्टरशी संपर्क साधा. त्याआधी बाधित जनावरांचं इतर जनावरांपासून विलगीकरण करा. जनावरांसाठीची योग्य ती कीटकनाशकांची फवारणी करावी. डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषधोपचार करावे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Ashadhi Wari 2025 : आषाढीचा उपवास कधी सोडावा जाणून घ्या...

Ashadhi Ekadashi 2025 : आषाढी एकादशी वारीसाठी एसटी महामंडळाकडून विशेष गाड्यांची सुविधा; जाणून घ्या

Himachal Pradesh : हिमाचल प्रदेशात पावसाचा तांडव ; ढगफुटीमुळे 69 मृत्यू, 400 कोटींचं नुकसान

Amit Shah Pune : "बाजीराव पेशवेंनी 40 वर्षाच्या आयुष्यात..." पुण्यात शाहांकडून पेशवांच्या शौर्यावर भाष्य