ताज्या बातम्या

Crime | अल्पवयीन मुलीचा ओला टॅक्सी चालकाने केला विनयभंग

पोलिसांनी आरोपीला घेतले ताब्यात

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत ओला टॅक्सी (Ola Taxi) चालकाने विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार आरे कॉलनीत घडला आहे. याप्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदविण्यात आला असून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. मुरारी सिंग (वय २९) असे सदर आरोपीचे नाव आहे.

एका 15 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीने 25 मे रोजी सकाळी 10 च्या सुमारास रॉयल पाम येथे तिच्या घरी येण्यासाठी मुंबई विमानतळावरून ऑनलाइन ओला टॅक्सी बुक केली. व मुरारी कुमार सिंह नावाचा ओला टॅक्सी चालक तेथे पोहोचला. आरोपी मुरारी गाडी चालवत असताना वाटेती अल्पवयीन मुलीकडे बघत होता व मला अजून कोणी मैत्रीणी नाहीत असे म्हणत मुरारीने विद्यार्थिनीशी मैत्री करायचा प्रयत्न केला. मुलीने त्याला नकार दिला.

ओला टॅक्सी रॉयल पाम त्याच्या सोसायटीत पोहोचल्यानंतर तिच्याकडे भाडे भरण्यासाठी सुटे पैसे नव्हते. विद्यार्थिनीने सुट्टे पैसे घेऊन येते, असे ड्रायव्हरला सांगितले. त्यावर ड्रायव्हर मुरारी सिंग याने अल्पवयीन मुलीला अश्लील हावभाव केले. दरम्यान, पीडितेने संपूर्ण घटना कुटुंबियांना सांगितली असता त्यांनी आरे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

या प्रकरणाची नोंद केल्यानंतर आरे पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी आरोपी मुरारी कुमार सिंग याला भगतसिंग नगर गोरेगाव येथून सीसीटीव्ही फुटेजद्वारे अटक केली असून मुरारीने गुन्ह्याची कबुली दिली आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपी मुरारी सिंगला 30 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Sanjay Shirsat On Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : "पडझड ही उबाठा गटाची झाली, राज ठाकरेंची नाही"

Raj Thackeray On Devendra Fadnavis : "माझे वडील आणि काका इंग्रजीत शिकले पण..." फडणवीसांच्या टीकेला राज ठाकरेंकडून सडेतोड उत्तर

Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : सुप्रिया सुळे यांनी आदित्य ठाकरे यांना खेचलं, स्टेजवर नेमकं काय घडलं?

Uddhav Thackeray on Eknath Shinde : "एका गद्दाराने काल 'जय गुजरात' अशी घोषणा केली" उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेवर निशाणा