ramesh bornare and Dilip Walse PatilTeam Lokshahi
महाराष्ट्र
शिवसेना आमदाराच्या त्रासामुळे महिलेने मागितली आत्महत्येची परवानगी
गृहमंत्र्यांना लिहिले पत्र, वैजापूर उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना दिले पत्र
आमदार रमेश बोरणारे(ramesh bornare)यांच्या भाऊजईने गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना पत्र पाठवले आहे. जयश्री दिलीपराव बोरणारे त्यांचे नाव आहे. आमदार बोरणारे यांना मारहाण केल्याचा याआधी त्यांनी आरोप केला होता. याबाबत वैजापूर उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना दिले पत्र दिले आहे.
यापुर्वी झाला होता वाद
गावात भाजपच्या शाखेचं उद्घाटनास जाणाऱ्या महिलेस मारहाण केल्याचा आरोप यापुर्वी आमदार बोरणारे यांच्यांवर झाला होता. भाजपच्या कार्यक्रमाला का गेल्या म्हणून बेदम मारहाण केली, असा आरोप पीडित महिलेने केला होता. तसेच यावेळी त्यांच्या पतीला सुद्धा मारहाण केली असल्याचा आरोप महिलेनं केला आहे.