ताज्या बातम्या

अपघातग्रस्त चिंतामणी ट्रॅव्हल्स बसमध्ये क्षमतेपक्षा अधिक प्रवासी? चौकशी करून कारवाईचे निर्देश - पालकमंत्री संजय राठोड

Published by : Siddhi Naringrekar

नाशिक-औरंगाबाद मार्गावर नांदूरनाका येथे एका खासगी प्रवासी बसला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या भीषण दुर्घटनेत आतापर्यंत दहा ते बारा प्रवाशांचा जळून मृत्यू झाला आहे. तर मृतांची संख्या वाढण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. तब्बल 10 ते 12 प्रवाशी या भीषण दुर्घटनेत जिवंत जळाले आहेत.

याच पार्श्वभूमीवर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. यावर यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, चिंतामणी ट्रॅव्हल्स मध्ये क्षमतेपक्षा अधिकचे प्रवासी बसविले गेले असल्याचे निदर्शनास येत असून त्याची चौकशी करून कारवाईचे निर्देश दिलेले आहेत.

तसेच त्यांनी त्यांनी अपघात झाल्यानंतर चिंतामणी ट्रॅव्हल्स च्या कार्यालयात भेट दिली. नाशिक जिल्हाधिकारी यांचेशी भ्रमणध्वनी वरून संपर्क साधला. शिवाय ट्रॅव्हल्स संचालकांकडून प्रवाशांबाबत माहिती घेतली. आग लागण्यामागे कारण काय, ट्रॅव्हल्स बस मध्ये पुरेशी सुरक्षा यंत्रणा होती का याची चौकशी त्यांनी केली आहे.

Eknath Shinde On Wadettiwar: वड्डेटीवाराचं डोकं फिरलं आहे; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची जोरदार टीका

Shantigiri Maharaj: नाशिक लोकसभेतून माघारीचा अखेरचा दिवस, शांतीगिरी महाराज निवडणूक लढण्यावर ठाम

Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी-गुजराती वाद? घाटकोपरमधील गुजराती बहुल सोसायटीतील प्रकार

दिंडोरी लोकसभेतून अखेर जे पी गावित यांची माघार; म्हणाले...

Sadabhau Khot : महाविकास आघाडी ही भरकटलेली आघाडी आहे